एकाबाजूला अजित पवार गट भाजपसोबत आला, तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टात, शिंदे गटातील आमदार प्रचंड तणावाखाली

BIG BREAKING | अजित पवार यांची युतीत आणि सरकारमध्ये एन्ट्री झाल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. ज्या अजित पवार आणि राष्ट्रवादीवर टीका करून शिवसेना सोडली. त्याच अजित पवारांचे आदेश आता मानावे लागणार असल्याने शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ झाले आहेत. राष्ट्रवादीशी युती हेच कारण देतं बाहेर पडलेला शिंदे गट प्रचंड राजकीय अडचणीत सापडला आहे. अनेक आमदारांनी शिंदे यांच्याकडे निर्णय चुकल्याचे म्हटले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय
दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कायदेशीर संघर्ष पुन्हा एकदा पुढे आला आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भातील प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवलं, तर 16 सदस्यांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला असून, यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहे.
प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घ्यावा, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना निर्देश द्यावेत अशी मागणी सुनील प्रभू यांनी याचिकेत केली आहे.
शिंदे गटाची तातडीची बैठक
आमदारांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांनी आत आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी 7 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीत सध्याच्या राजकिय परिस्थितीवर सर्व आमदार आणि खासदारांशी चर्चा होणार आहे.
News Title : Shinde Camp in danger zone after latest political crisis check details on 05 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं