मला बाकीच्या तांत्रिक गोष्टी अजिबात माहिती नाहीत, पण शिवतीर्थावर दसरा मेळावा होणारच, उद्धव ठाकरेंनी ठणकावले

Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार की नाही होणार याबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे. संभ्रम वगैरे काहीही नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार आहे आणि तो शिवतीर्थावर होणार आहे, असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितले आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. तसंच हिंगोलीतील भाजपचे कार्यकर्तेही यावेळी शिवसेनेत दाखल झाले आहे. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यावर परखड भूमिका मांडली.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार की नाही होणार याबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे. संभ्रम वगैरे काहीही नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार आहे. पण महाराष्ट्रातून शिवसैनिक हे मुंबईकडे येण्यास निघाले आहे. परवानगीबाबत जी काही तांत्रिक मांत्रिक जो काही भाग आहे, ते पाहतील. पण, शिवतीर्थावर दसरा मेळावा होणारच, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
प्रत्येकवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये उत्साहात साजरा केला जातो. तिथं राज्यातून शिवसेनेचे कार्यकर्ते येतात. एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी भूमिका जाहीर केल्यापासून शिवसेनेत फुट पडली आहे. तसेच दोन्ही गट शिवसेना आमची असल्याची वक्तव्ये करीत आहे. दोन्ही गट कोर्टात गेल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कमध्ये कोणाचा दसरा मेळावा हे सुध्दा पाहावं लागणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shivsena Chief Uddhav Thackeray reaction on Dasara Melava check details 29 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं