Telangana Election | तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही बहुमताने सत्ता आणण्याची योजना आखात आहे काँग्रेस, KCR यांची चिंता वाढली

Telangana Assembly Election 2023 | तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चांगल्या कामगिरीच्या शक्यतेबद्दल कॉंग्रेस खूप उत्सुक आहे. कर्नाटक पाठोपाठ तेलंगणाही जिंकण्याचा पक्षाला विश्वास आहे. राहुल गांधींच्या जाहीर सभांना होणारी ऐतिहासिक गर्दी आणि भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्यांचे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारं पक्षांतर आणि तेलंगणात नगण्य अस्तित्व असलेला भाजप पक्ष आणि त्यातही प्रदेश भाजपमधील अंतर्गत कलह यामुळे काँग्रेस पक्षाचा हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
तेलंगणात बीआरएसशी थेट लढत असल्याचे काँग्रेसच्या रणनीतीकारांचे देखील मत आहे. बीआरएसचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव राज्याच्या स्थापनेपासून मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र आता लोक अनेक मुद्द्यांवर KCR सरकारवर नाराज आहेत आणि मतदारांच्या मोठ्या वर्गाला बदल हवा आहे. हे आव्हान स्वीकारण्यास पक्ष तयार आहे असं काँग्रेसच्या रणनीतीकारांनी सांगितले.
खम्मम रॅलीने बदलले वातावरण
खम्मम रॅलीतील गर्दीमुळे वातावरणही बदलल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. बीआरएसच्या आणखी अनेक नेत्यांना काँग्रेसमध्ये यायचे आहे. पण काँग्रेस पक्ष सध्या घाई करण्याच्या बाजूने नाही. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, असे प्रदेश काँग्रेसच्या एका नेत्याने माध्यमांना सांगितले. सुमारे तीन डझन मोठ्या बीआरएस नेत्यांनी यापूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
तेलंगणाच्या निर्मितीत काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यूपीएने २०१४ मध्ये तेलंगणाची स्थापना केली होती. या मुद्द्यावर मतदारांना प्रभावित करण्यात पक्षाला अपयश आले आहे. पण यावेळी पक्ष आक्रमक पवित्रा घेऊन निवडणूक लढवत आहे. तेलंगण काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी म्हणाले की, आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवू आणि बहुमताने सत्तेत येऊ.
लवकरच उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी २७ जून रोजी काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे, पाच महत्त्वाच्या आश्वासनांसह निवडणूक जाहीरनामा सोपा करणे आणि जनतेशी संबंधित मुद्दे मांडण्याचा सल्ला दिला होता. यामुळे पक्ष लवकरच उमेदवारांची घोषणा करू शकतो. परिणामी स्थानिक नेत्यांना तयारीला मोठी वेळ मिळेल.
प्रदेश काँग्रेसला भाजपची फारशी चिंता नाही. २०१९ नंतर भाजपचा आलेख वाढण्याऐवजी घसरला आहे, असे प्रदेश काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना प्रदेशाध्यक्ष केल्यास भाजपला फारसा निवडणुकीत फायदा होणार नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत CRPF शहीद जवानांच्या नावाने मतं मागत भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या. मात्र आता लोकं त्यांच्या या राजकारणाला बळी पडणार नाहीत आणि ते महागाई ने त्रस्त असून याच मुद्यावर आणि बेरोजगारीवरून भाजपाला मतं देणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.
तेलंगणात पक्षांचे बलाबल
2018 च्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसला (तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती) 88 जागांसह 47 टक्के मते मिळाली होती. भाजपला एका जागेसह सात टक्के मते मिळाली तर काँग्रेसला १९ जागांसह २८ टक्के मते मिळाली. तर एमआयएमला सुमारे तीन टक्के मतांसह सात जागा मिळाल्या होत्या.
News Title : Telangana Assembly Election 2023 Congress in action mode 11 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं