कर्नाटक तो झाँकी है, तेलंगाना अभी बाकी है! तेलंगणातही काँग्रेसची लाट येण्याचा अंदाज, 'इंदिरा अम्मा' फॅक्टर महत्वाचा

Telangana Congress | कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर आता दक्षिणेतील तेलंगणात काँग्रेसची लाट येण्याचा अंदाज स्थानिक वृत्तवाहिन्यांनी व्यक्त केला आहे. तेलंगणात भाजपचं तसं अस्तित्व नाही, पण काँग्रेसने यापूर्वीच सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची चिंता वाढवली आहे. विशेष म्हणजे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला तेलंगणात प्रचंड प्रतिसाद मिळला होता. यावेळी राहुल गांधींनी स्थानिक नेत्यांना संबोधित करताना आगामी तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येईल असे संकेत दिले होते.
तसेच कर्नाटकातील प्रचार संपताच प्रियांका गांधी यांनी थेट तेलंगणात जाऊन विराट सभा घेतल्या होत्या. यावेळी प्रियांका गांधी यांच्यात आम्हाला ‘इंदिरा अम्मा’ दिसतात असे स्थानिक लोकं सांगत होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत तेलंगणात ‘इंदिरा अम्मा’ फॅक्टर मोठ्या प्रमाणात काम करेल असे संकेत आधीच मिळाल्याने तेलंगणात स्थानिक काँग्रेस मोठ्या प्रमाणात कामाला लागली आहे.
दुसरीकडे, राज्यात अस्तित्व नसलेल्या भाजपवर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ED आणि सीबीआय’च्या कारवायांमुळे लक्ष केंद्रित केले होते आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसने थेट KCR यांची सत्ता उलथून लावण्यासाठी मोठी योजना आखली आहे आणि त्याचे मोठे परिणाम दिसतील याची कुणकुण KCR यांना देखील आल्याने त्यांची चिंता प्रचंड वाढल्याचं वृत्त आहे.
तेलंगणात केवळ राहुल गांधी फॅक्टर नव्हे तर प्रियांका गांधी यांचा ‘इंदिरा अम्मा’ फॅक्टर घरोघरी जाऊ लागल्याने KCR यांची चिंता वाढल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे तेलंगणात हिंदुत्वाचा मुद्दा अधिक चालत नाही आणि त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपमध्ये दोन गट आहेत आणि त्यात भाजपसाठी स्थानिक नेतेच उपलब्ध नसल्याने तेलंगणात सत्ताधारी भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस असाच सामना होणार हे निश्चित आहे. विधानसभा आणि लोकसभा असा दोन्ही निवडणुकीत काँग्रेस मोठा आकडा गाठेल असे काँग्रेसला अंतर्गत गोटातून संकेत मिळेल आहेत.
कर्नाटकात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत 135 जागांवर विजय मिळवला आहे. २०१८ मध्ये १०४ जागांवर असलेल्या भाजपाला यंदा केवळ ६६ जागा मिळाल्या आहेत. तर पहिला किंगमेकर ठरलेल्या जेडीएसला केवळ 19 जागा जिंकता आल्या.
एका मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटकातील विजयानंतर तेलंगणात काँग्रेसच्या घोडदौडीबाबत केसीआर सतर्क झाले आहेत. कारण, बुधवारी खासदार आणि आमदारांशी संवाद साधताना त्यांनी सहकाऱ्यांना अतिआत्मविश्वास टाळण्यास सांगितले आहे. रिपोर्टनुसार, केसीआर यांनी या बैठकीत त्यांनी टीकेचा मुद्दा काँग्रेस कडे वळवल्याने त्यांची चलबिचल अधीरेखित झाली आहे.
तेलंगणात काँग्रेस आणि रेवंत रेड्डी यांना मिळणार प्रतिसाद
तेलंगणा काँग्रेस कर्नाटकच्या विजयाला टर्निंग पॉईंट म्हणत आहे आणि येथेही विजयाची ग्वाही देत आहे. कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला नाकारले असून काँग्रेसला मतदान केले आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “आता तेलंगण आहे. रिपोर्टनुसार, बीआरएस नेत्यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत की काँग्रेसला हलक्यात घेतले जाऊ शकत नाही. तसेच राज्यातही काँग्रेसची लाट येऊ शकते असं बीआरएस नेत्यांना वाटू लागल्याने KCR प्रचंड चिंतेत असल्याचं म्हटलं जातंय.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Telangana Congress upcoming election check details on 19 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं