भाजपसाठी सत्ता नसल्याने मोदी सरकारने प. बंगालचा 1 लाख 17 हजार कोटीचा निधी रोखला, TMC ची राज्यभर आंदोलनं, भाजप आमदाराचीही साथ

TMC Protest Against Modi Govt | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार यांच्यातील संघर्ष नवीन नाही. पश्चिम बंगाल राज्य सरकारला अनेक कल्याणकारी योजनांचा निधी न दिल्याने आता ममता बॅनर्जींच्या पक्षाने मोदी सरकारवर थेट रस्त्यावर उतरून हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगाल राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने रविवारी संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये निदर्शने केली. यावेळी पश्चिम बंगाल राज्यातील भाजप नेत्यांच्या सल्ल्यानुसार केंद्राने हा निधी थांबवल्याचा आरोप पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
राज्याचे मंत्री आणि कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम यांनी सांगितले की, राज्याला आर्थिकदृष्ट्या वंचित ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या षडयंत्राचा निषेध नोंदविण्यासाठी आम्ही दुपारी १२ ते ४ या वेळेत धरणे आंदोलन करत आहोत. मोदी सरकारकडून राज्याला १ लाख १७ हजार कोटी रुपयांची थकबाकी देण्यात आलेली नाही. केंद्राने राजकारण थांबवून राज्याची थकबाकी लवकरात लवकर द्यावी, अशी आमची इच्छा आहे. मणिपूर आणि हरयाणातील हिंसाचाराचा ही आम्ही निषेध नोंदवतो असं ते म्हणाले.
दरम्यान, गंगारामपूरचे भाजप आमदार सत्येंद्र नाथ रे यांनी दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील टीएमसीच्या आंदोलनात केवळ सहभागच घेतला नाही तर या मागणीचे समर्थनही केले. राज्याला त्याची देणी मिळायला हवीत, असा माझा विश्वास असल्याने या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मी येथे आलो आहे. राज्य सरकार आणि केंद्राने एकत्र बसून हा प्रश्न सोडवावा. ही जबाबदारी निवडून आलेल्या सरकारांची आहे.
मात्र, आंदोलनस्थळी संक्षिप्त भाषण केल्यानंतर भाजपचे आमदार तेथून निघून गेले. टीएमसीने भाजप आमदाराच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. फिरहाद हकीम म्हणाले की, आम्ही त्याचे स्वागत करतो. आपण जे बोलतोय ते खरं आहे हे त्यांना समजलं आहे. येत्या काळात असे आणखी नेते आमच्यात सामील होतील.
दुसरीकडे, भाजपचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी पक्षाच्या आमदाराचे हे कृत्य मनमानी असल्याचे म्हटले आहे. मात्र, राज्य सरकारने प्रलंबित निधी लवकर द्यावा, अशी आमचीही इच्छा आहे, हे खरे आहे. आमचा याला विरोध नाही, पण पुढील पैसे मिळण्यासाठी टीएमसीला खर्चाचा तपशील केंद्राला द्यावा लागेल, असे ते म्हणाले.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने गरिबांसाठीच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यासाठी निधी न दिल्याबद्दल मोदी सरकारवर अनेकदा निशाणा साधला आहे. या मागणीसाठी सुरुवातीला राज्यातील भाजप नेत्यांच्या घरांना घेराव घालण्याची योजना पक्षाने आखली होती, मात्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली. त्यानंतर पक्षाने कार्यक्रमाची तारीख बदलून निषेध केला आणि रविवारी राज्यभर धरणे आंदोलन केले.
News Title : TMC Protest Against Modi Govt check details on 07 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं