Tomato Price Hike | देशाच्या अर्थमंत्री टोमॅटो खातात का? टोमॅटोच्या वाढत्या किमतीला उत्तर देऊ शकाल का? - प्रियांका चतुर्वेदी

Tomato Price Hike | टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे विरोधी पक्षनेत्यांनी अर्थमंत्र्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी टोमॅटोच्या किमतीवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘या देशाचे अर्थमंत्री टोमॅटो खातात का? टोमॅटोच्या वाढत्या किमतीला त्या उत्तर देऊ शकतील का?
संसदेत केलं होते हे विधान
खरं तर शिवसेना नेत्याचे हे ट्विट म्हणजे निर्मला सीतारामन यांना लगावलेला टोला हा आधीच्या घटनेशी संबंधित आणि उपहासात्मक आहे. झालं असं की, २०१९ मध्ये सभागृहाच्या हिवाळी अधिवेशनात कांद्याच्या वाढत्या किमतीवरून गदारोळ झाला होता. याबाबत विरोधकांनी अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणालय होत्या की, त्या अशा कुटुंबातून येतात जिथे कांदा-लसूण फारसे खाल्ले जात नाही. त्या म्हणालय होत्या की, माझ्या कुटुंबात कांदा-लसूण फारसा वापरला जात नाही. त्यामुळे माझी काळजी करू नका. त्याच विषयाला अनुसरून खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे की, त्यांनी कांदा खाल्ला नाही, त्यामुळे त्यांनी त्यावर उत्तर दिले नाही. आता टोमॅटोचे भाव वाढत आहेत, आता टोमॅटो खाता की नाही?
क्या देश की वित्त मंत्री टमाटर खाती हैं? क्या टमाटर के बढ़ते दामों का जवाब दे पायेंगी?
— Priyanka Chaturvedi?? (@priyankac19) June 27, 2023
देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने इतिहास रचला असून सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाज्या खरेदी करताना सुद्धा दमछाक होतं असून त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागतोय. महिना १०-२० हजार रुपये पगार असणाऱ्यांना तर जगणं नकोसं झालं आहे. भारतातील बहुतांश बाजारपेठांमध्ये पूर्वी १० ते २० रुपये किलो दराने मिळणाऱ्या टोमॅटोचे दर आता १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. दुसरीकडे घाऊक बाजारात टोमॅटो ६५ ते ७० रुपये किलोने विकला जात होता, तर आठवडाभरापूर्वी ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात होता. त्याचप्रमाणे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ४० ते ५० रुपये किलोच्या आसपास होते. म्हणजे टोमॅटोचे दर दुप्पट झाले आहेत.
टोमॅटोचे दर वाढले!
दिल्लीत टोमॅटो ७० ते १०० रुपये किलो, तर मध्य प्रदेशच्या बाजारात टोमॅटो ८० ते १०० रुपये किलोने विकला जात आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात टोमॅटो ८० ते १०० रुपये, राजस्थानमध्ये ९० ते ११० रुपये आणि पंजाबमध्ये ६० ते ८० रुपये दराने विकला जात आहे.
News Title : Tomato Price Hike MP Priyanka Chaturwvedi check details on 27 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं