उद्धव ठाकरे यांच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरामधील जाहीर सभेत तुफान जनसागर उसळला, सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल

Uddhav Thackeray Rally at Pachor | उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यातील पाचोरामधील जाहीर सभेत बोलत होते. खेड, मालेगावनंतर ठाकरे यांची शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा पार पडली. या सभेत तुफान जनसागर असल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपाला लक्ष करताना जोरदार हल्लाबोल केला. “आम्ही दगडे मारून सभा बंद करणारे लोकं आहोत, त्यामुळे आम्हाला चॅलेंज करू नये”, असं थेट आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले होते. याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्तुत्तर दिले.
आज पाचोरा, जळगाव येथील प्रचंड महाविराट सभेने महाराष्ट्राला दाखवून दिले की, खरी शिवसेना कुणाची!
या प्रचंड जनसमुदायला संबोधित करताना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे! pic.twitter.com/liF1NkSzzS
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 23, 2023
अशा घुशी खूप पाहिल्या
काही जणांना वाटलं होतं, तेच म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार म्हणे. अशा घुशी खूप पाहिल्या, पण अशा घुशींच्या शेपटीला धरुन त्यांना निवडणुकीत आपटायचं आहे, असं म्हणतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दगड घेऊन सभेत घुसणार या आव्हानावर प्रत्युत्तर दिलं.
शेतकरी संकटात असताना सत्ताधारी अयोध्येच्या वाऱ्या
अनाथांच्या नाथा झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या आमच्या बांधावरती’ अशी कविता सादर करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर टीका केली आहे. शेतकरी संकटात असताना सत्ताधारी अयोध्येच्या वाऱ्या करत आहे. तरुण शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण, सरकारला त्याविषयी काहीही वाटत नसल्याचं ठाकरे म्हणाले. यावेळी 40 गद्दार गेल्याने फरक पडत नाही तर एक निष्ठावंत गेल्याने पडतो असंही ठाकरे यांनी म्हटले. जळगावातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेला संबोधन केलं. त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Uddhav Thackeray Rally at Pachor Jalgaon check details on 23 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं