VIDEO | शिंदेंच्या बंडानंतर जनमत उद्धव ठाकरे यांच्याबाजूने झुकतंय हे स्पष्ट होतंय | राणेंची टीका सुद्धा उद्धव यांच्या फायद्याची

Uddhav Thackeray | एकनाथ शिंदे गटाची बंडखोरी, आमदार, खासदारांसह नगरसेवक,पदाधिकारीही शिंदे गटात सामील होत आहेत. एकीकडे एक-एक जण उद्धव ठाकरेंची साथ सोडत असताना दुसरीकडे खरी शिवसेना कोणती यावरुन कायदेशीर लढाई सुरु आहे. त्यातच नव्याने पक्षबांधणी करण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नव्याने उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. ऑगस्ट महिन्यात ते राज्याचा दौरा करणार आहेत.
उद्धव ठाकरेंनी युती तोडण्यामागे स्पष्टीकरण देताना म्हटले :
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘हेल्दी पॉलिटिक्स’ करावं. आम्ही तर मित्रच होतो. 25-30 वर्षे आपण त्यांचे सोबतीच होतो. तरीसुद्धा त्यांनी 2014 ला युती तोडली. कारण काहीही नव्हतं. तेव्हा आपण हिंदुत्व सोडलेलं नव्हतं आणि आजही सोडलेलं नाही. तेव्हासुद्धा भाजपने शिवसेनेशी युती शेवटच्या क्षणाला तोडली होती. त्यावेळी तर आम्ही मित्रच होतो त्यांचे 2019 ला. काय मागत होतो? मी अडीच वर्षांसाठी शिवसेनेकरिता मुख्यमंत्रीपद मागत होतो आणि द्यायचं ठरलं होतं. ते मुख्यमंत्रीपद माझ्यासाठी नव्हतं. अडीच वर्षे मुख्यमंत्री पद का मागितले होते? तर मी सरत्या काळामध्ये माननीय शिवसेनाप्रमुखांना वचन दिले होते की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. मात्र तसं बघितलं तर माझं ते वचन अजूनही अर्धवटच आहे असे म्हणावे लागेल. कारण मी मुख्यमंत्री बनेन असे म्हणालो नव्हतो. मुख्यमंत्री पद मला एक आव्हान म्हणून स्वीकारावे लागले. कारण सर्व गोष्टी ठरवल्यानंतर भाजपकडून त्या नाकारण्यात आल्या. म्हणून मला ते करावं लागलं, असं ते म्हणाले.
जनमत उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकतंय हे प्रत्यक्ष दिसतंय :
एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी थेट तुळजापुरात जाऊन तेथे राज्यभरातून येणाऱ्या लोकांच्या मनात नेमकं काय आहे याचा थेट कानोसा घेतला आहे. यामध्ये अनेक वरिष्ठ नागरिक आणि तरुणांनी आपली बाजू सध्याचा राजकारणावर मांडली. मात्र त्यातून एकूण जनमत हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकतंय हे स्पष्ट दिसतंय. विशेष म्हणजे लोकांना नेमकं काय चाललंय आणि काय वाईट आणि काय चुकीचं हे चांगलं समजतंय असं त्यातून निदर्शनास आलं आहे. भाजप बद्दलही अनेकांच्या मनात चांगली मतं नसल्याचंही जाणवतं.
अनेक वृत्त वाहिन्यांचे सर्व्हे राजकीय विषयांवर येतं असतात. मात्र त्यातील एकूण विषय पाहिल्यास ते एखाद्या ‘पेड सर्व्हे’ प्रमाणे मतदारांचे मत परिवर्तन करण्यासाठीच केलेले असतात असा साधारण लोकांमध्ये समज धृढ झाला आहे. मात्र एबीपी माझाने थेट लोकांमधून मत जाणून घेतल्याने विषय स्पष्ट होताना दिसत असून त्यात उद्धव ठाकरे यांच्या प्रति लोकांना सहानुभूती आणि मूळ बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल प्रेम असल्याचं दिसतंय. त्यामुळे उद्या शिंदे गटाने आपले उमेदवार बाळासाहेबांचं नाव वापरून उभे केले तरी मतदार हा समजूतदार असतो आणि त्याला शिंदे गटाचा उमेदवार आणि उद्धव ठाकरे (मूळ शिवसेना) उमेदवार समजण्याइतका तो समजूतदार असेल यात वाद नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News : Uddhav Thakceray getting favor from peoples check details 27 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं