'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे भाजपकडून आदेश

नवी दिल्ली: ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकाचं प्रकाशन करत वाद ओढवून घेणारे जयभगवान गोयल यांनी पक्षाने आदेश दिला तर पुस्तक मागे घेऊ असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे त्याप्रमाणे नरेंद्र मोदी काम करत असल्याने आपण त्यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असल्याचं सांगितलं. तसंच कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असंही ते म्हणाले आहेत.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यावरून भारतीय जनता पक्षाला फैलावर घेतलंय. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू झालंय. संभाजी ब्रिगेडने तर भारतीय जनता पक्षाला धमकीच दिलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्यात येणार असल्याचं भारतीय जनता पक्षाचे नेते श्याम जाजू यांनी सांगितलंय. यामुळे या वादग्रस्त पुस्तकावरुन सुरु झालेला वाद लवकरच मिटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
तर दुसरीकडे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे लेखक भारतीय जनता पक्षाचे नेते जय भगवान गोयल यांनी पुस्तक परत घेण्यास नकार दिला आहे. “शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदींच्या तुलनेवर पुस्तक परत घेण्याचा प्रश्नच नाही. मी याबद्दल माफी मागणार नाही. तसेच हे पुस्तकही परत घेणार नाही,” अशी प्रतिक्रिया देत जय भगवान गोयल यांनी दिली.भारतीय जनता पक्षाचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे काल (१२ जानेवारी) प्रकाशन करण्यात आले होते.
Web Title: Aaj Ke Shivaji Narendra Modi controversy book is took back by BJP.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं