केजरीवालांची खासदार असलेल्या भोजपुरी कलाकारासोबत तुलना करण्याचा प्लॅन यशस्वी

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच भाजपाच्या रणनीतीकारांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारात तुलना करण्याची योजना आखली होती. मात्र, आपच्या सोशल मीडिया टीमने कुठेही चलबिचल न होता, भाजपचे दिल्लीतील खासदार आणि भोजपुरी कलाकार मनोज तिवारी यांच्याशी केजरीवालांची तुलना सुरूच ठेवण्याची योजना आखली होती.
भाजपने सर्वप्रकारे आप’च्या प्रचारातून विकासाचा मुद्दा निघून जावा यासाठी निरनिराळे प्रयत्न केले. अगदी आप विचलित होतं नसल्याचे दिसताच केजरीवालांना देशद्रोही ठरवण्यापर्यंत टीका करण्यात आली. मात्र आप’ने समाज माध्यमांवर खासदार मनोज तिवारी यांच्याशीच केजरीवालांची तुलना सुरु ठेवली आणि मोदींच्या टीकेला गुगुळीत प्रतिउत्तर देऊन महत्व कमी केलं.
त्यात मनोज तिवारी यांच्या अनेक मुलाखती झळकल्या आणि त्यात त्यांचं अज्ञान दिल्लीच्या मतदारांना दिसलं आणि आप’ने त्याचा पुरेपूर वापर केला. परिणामी, भाजपच्या नादाला लागून शिक्षण, वीज आणि आरोग्यच्या सुविधा गमावू लागण्याच्या भीतीने धार्मिक वातावरण करून देखील आप’ला मतदान करत, भाजपाला दिल्लीच्या राजकारणापासून दूरच ठेवणं पसंत केलं.
त्यामुळे मोदींचा एकूण प्रचार कुचकामी ठरला तर अमित शहांचा चाळीस पेक्षा अधिक प्रचार सभा निष्फळ ठरल्या, कारण आप’ने त्यांची पूर्ण रणनीती भोजपुरी कलाकारावर केंद्रित ठेऊन मतदाराच्या मनात तेच भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्याने भविष्य अवघड होण्याची धास्ती मतदाराच्या मनात निर्माण केली. परिणामी आजचे निकाल जे अपेक्षित होते, त्याप्रमाणेच आल्याचं चित्र आहे.
निकालाअंती गंमतीची बाब म्हणजे अनेक ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे नेते आणि भोजपूरी अभिनेते असणाऱ्या मनोज तिवारी यांच्या चित्रपटांच्या गाण्यांवर डान्स करत आनंद व्यक्त केला आहेत. यावरूनच आपच्या रणनीतीवर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.
Web Title: AAP Party social Media team target to MP Manoj Tiwari and comapared with CM Arvind Kejariwal.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं