अत्याधुनिक पाणबुडी 'आयएनएस खांदेरी' नौदलाच्या ताफ्यात दाखल

मुंबई: ‘आयएनएस खांदेरी’ ही अत्याधुनिक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात शनिवारी समाविष्ट करण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘आयएनएस खांदेरी’ आणि ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकांच्या जलावतरणाचा कार्यक्रम पार पडला. संरक्षणमंत्रिपद स्वीकारल्यानंतर राजनाथ सिंह यांनी देशातील सर्व महत्त्वाच्या तळांना भेटी दिल्या. पण, पश्चिम नौदल कमांडची भेट ‘आयएनएस खांदेरी’ ही पाणबुडी तयार नसल्याने रखडली होती. नौदल गोदीतील कार्यक्रमात ‘खांदेरी’ नौदलाकडे सूपूर्द करण्याचा कार्यक्रम सकाळी साडेसात वाजता पार पडला.
मुंबईवर २६/११ रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तसाच कट आता पुन्हा रचला जात आहे. तो आता यशस्वी होऊ देणार नाही. कोणीही देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर नौदलाकडून त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल,” असं राजनाथ सिंग यावेळी म्हणाले. “१९७१ च्या युद्धात नौदलाची भूमिका ही महत्त्वपूर्ण होती. भारतीय नौदलाने व्यापारी मार्गावर नियंत्रण मिळवलं होतं. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत त्यांचं कंबरडं मोडलं होतं.
आयएनएस खांदेरीमुळे भारतीय नौदलाची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे, हे पाकिस्तानने आता लक्षात ठेवावं. देशातील सशस्त्र दलांच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आधुनिकीकरणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असंही त्यांनी नमूद केलं. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरूनच या पाणबुडीचं नाव ठेवण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचं सामर्थ्य ओळखलं होतं. त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याची क्षमता भारतीय नौदलात आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अरबी समुद्रातील सुरक्षेसाठी या पाणबुडीवर अवलंबून राहता येणे शक्य होणार आहे. एकदा पाण्यात गेल्यानंतर एक महिनाभर ही पाणबुडी पाण्यात राहून आपले काम करू शकेल. या पाणबुडीवर सुमारे ५० जणांचा ताफा कार्यरत राहू शकतो. या पाणबुडीत कार्यरत असलेल्या जवान, अधिकाऱ्यांचा शिधा संपल्यावर त्यांना परत मागे किनाऱ्याकडे यावे लागते. अन्यथा आणखी काही काळदेखील ही पाणबुडी समुद्रात पाण्याखाली राहून सक्षमपणे काम करू शकते.
या प्रकारच्या पाणबुड्यांमध्ये ऊर्जेसाठी बॅटऱ्या लावलेल्या असतात. सुमारे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांनंतर या पाणबुडीतून पाइप बाहेर काढून त्याद्वारे ऑक्सिजन आत घेऊन बॅटऱ्या चार्ज केल्या जातात. शक्यतो ही कार्यवाही रात्रीच्या वेळी गडद अंधारात केली जाते. कोणालाही पाणबुडी नेमकी कुठे आहे हे कळू नये यासाठी ही काळजी घेतली जाते. तर दिवसाउजेडी ही पाणबुडी खोल पाण्यामध्ये असते. २०० ते ३०० मीटर पाण्याखाली जाऊन कार्यरत राहण्याची क्षमता या पाणबुडीची आहे. अत्यंत सक्षम अशा या पाणबुडीचे चांगले डिझाइन तयार करण्यात आले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं