J&K ३७०: सकाळपासून जमिनी खरेदीचे मेसेज; म्हणून राजू पाटलांकडून अदानी-अंबानींच अभिनंदन?

श्रीनगर : कलम ३५- ए आणि ३७० वरून गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील वातावरण तापत चाललं आहे. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता काश्मीरमध्ये वेगानं घडामोडी घडत आहेत. काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याची शिफारस केली. या शिफारशीला राष्ट्रपतींनीही मान्यता दिली आहे. देशाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
दरम्यान, केंद्रातून हा निर्णय येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील यांनी, ‘‘तुर्तास अदानी अंबानींचे अभिनंदन! बाकीच्यांचे सकारात्मक परिणाम आल्यावरच! जय हिंद!’ अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारचा हा निर्णय प्रसार माध्यमांकडे यायला उशीर झाला असला तरी काश्मीर मध्ये जमीन खरेदी करण्यासाठीचे प्रोमोशनल मेसेजेस सकाळी १० वाजण्याच्या आधीच सुरुवात झाल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले. त्याचाच अप्रत्यक्ष संदर्भ देत राजू पाटील यांनी अदानी अंबानी यांच्या नावाने खोचक टोला लगावला आहे.
कलम ३७० रद्द झाल्यास जम्मू-काश्मीरला देण्यात येणारा विशेष दर्जा संपुष्टात येईल. त्यामुळेच कलम ३७० चा भाग असलेला ३५ अ कलमही रद्द होईल. या कलमानुसार इतर राज्यातील कोणताही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करू शकत नव्हता. त्यामुळे आता हा कलम रद्द झाल्यास ही अट रद्द होईल. केंद्राने जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची तिथल्या जनतेची बऱ्याच काळापासून मागणी होती असेही हा प्रस्ताव मांडताना अमित शाह म्हणाले आहेत. त्यामुळेच आता जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित झाले तर कोणत्याही भारतीय नागरिकाला तेथे मालमत्ता खरेदी करता येणार आहे. याच मुद्द्यावर राजू पाटील यांनी बांधकाम आणि उद्योग व्यवसायात असणाऱ्या आणि भाजपाच्या निकटवर्तिय मानल्या जाणाऱ्या अदानी आणि अंबानी यांना लक्ष्य केलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं