येडियुरप्पांनी प्रचंड भ्रष्टाचार केला | प्रल्हाद जोशी मुख्यमंत्री होतील | संभाषण लीक

बंगळुरू, ०५ मार्च: महिलेला नोकरी देण्याचं आमिष दाखवल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेले कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा दिला. या प्रकरणात जारकीहोळी यांची एक कथित सेक्स सीडी बाहेर आल्यानंतर कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचं सरकार अडचणीत सापडले होते. ज्या सेक्स टेपमुळे त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली, त्याच प्रकरणात महिलेशी जारकीहोळी यांनी केलेलं संभाषण आता लीक झालं आहे.
कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना खूप भ्रष्टाचार केला आहे आणि केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील असं जारकीहोळींनी या महिलेला सांगितल्याचं कळतंय. तसंच महाराष्ट्रातील लोक चांगले आहेत आणि कानडींना काही काम नाही असंही जारकीहोळी यात म्हणताना दिसत आहे. जारकीहोळींनी या सीडीतील सेक्स टेपमध्ये मांडलेल्या मतांमुळे भारतीय जनता पक्षावर मात्र नामुष्की आली आहे. काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या हे चांगले नेते होते असंही पूर्वाश्रमीचे काँग्रेसी जारकीहोळींनी म्हटलं होतं.
रमेश जारकीहोळी आणि त्या महिलेचं समोर आलेलं संभाषण काय आहे?
महिला – बेळगावात मराठी-कन्नड संघर्ष सारखा सुरू आहे?
जारकीहोळी – मराठी माणसं चांगली आहेत. … कानडींना काही काम नाही.
जारकीहोळी – सिद्धरामय्या उत्तम आहेत. येडियुरप्पांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे.
महिला – तुम्ही सारखे दिल्लीला जात असता, तुम्ही मुख्यमंत्री होणार का?
जारकीहोळी – प्रल्हाद जोशी मुख्यमंत्री होतील.
News English Summary: Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi has resigned after being accused of luring a woman to a job. The Bharatiya Janata Party (BJP) government in Karnataka was in trouble after an alleged sex CD of Jarkiholi came out. In the same case that led to his resignation, Jarkiholi’s conversation with the woman has now been leaked.
News English Title: After resignation Jarkiholi’s conversation with the woman has now been leaked news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं