‘मेक इन इंडिया’ म्हणजे काम कमी, बडबड जास्त: भारताचे हवाई दल प्रमुख

नवी दिल्ली: भारताचे हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमावरुन मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांची निर्मितीचा उद्देश आहे. पण सध्या काम कमी आणि फक्त चर्चा सुरु आहेत. मेक इन इंडियाचा उद्देश खूप चांगला आहे. पण प्रत्यक्षात काम खूप धीम्या गतीने सुरु आहे असे भदौरिया म्हणाले.
अजेंडा आज तक कार्यक्रमात बोलत होते. मेक इन इंडियामध्ये सहभागी असलेल्या सर्व भागीदारांनी एका उद्दिष्टाने काम सुरु केले तर स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्र निर्मितीचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो असे भदौरिया म्हणाले. “आम्ही आमचा पाठिंबा दिला आहे. डीआरडीओने वेळेत डिझाईन्स बनवल्या पाहिजेत. शस्त्रास्त्र बनवणाऱ्या सरकारी कंपन्यांनी निर्मिती मुल्य राखले पाहिजे. खासगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले पाहिजे” असे भदौरिया म्हणाले.
हवाई दलाचे प्रमुख भदोरिया म्हणाले की आम्ही संपूर्ण देशातील सर्व रडार एकमेकांशी जोडलेले आहेत. तसेच त्याला नेटवर्किंगने जोडलं गेलं आहे. यामुळे संपूर्ण देशावर लक्ष ठेवणं शक्य झालं आहे. त्यातील ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारी आकाश क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केल्यामुळे आपली हवाई संरक्षण यंत्रणा अधिक बळकट झाली आहे, असं ही ते म्हणाले.
एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया पुढे म्हणाले की, आगामी १० वर्षात ज्या काही योजना आहेत, त्या लवकरच पूर्ण करण्याचं लक्ष आहे. त्यानुसार ४० एलसीए ऑर्डर करत आहोत. त्यात अजून ८३ एलसीए ऑर्डर देण्यात येईल. त्यामुळे वायुदलातील लढाऊ विमानांची संख्या वेगाने वाढेल. यानंतर, एलसीएचे मार्क -2 विमान देखील आणले जाईल. त्या संदर्भातील कामही सुरू झाले असून त्यासाठी डीआरडीओ मदत करत आहे. मात्र पुढील ६ ते ८ वर्षात रडार सिस्टीम देखील पूर्णपणे स्वदेशी असतील असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.
स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्र निर्मितीच्या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे भदौरिया यांनी सांगितले. राफेल आणि एस-४०० च्या खरेदीने हवाई दलाची तात्काळ निकड पूर्ण होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. एअर फोर्स प्रमुखांनी फायटर विमानांच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या भारतीय कंपन्यांना स्टेल्थ टेक्नॉलॉजी, अत्याधुनिक सेन्सर्स, दीर्घ पल्ल्याची अस्त्रे विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.
Web Title: Agenda Aajtak 2019 Air Chief Marshal RKS Bhadauria Future LIP servicing about Make in India and Modi Government.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं