चीनच्या सीमेजवळील AN-३२ विमान बेपत्ता होताच राष्ट्रभक्ती धोनीच्या हँडग्लोव्जवर केंद्रित केली?

अरुणाचल प्रदेश: लोकसभा निवडणुकीत पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकनंतर डिजिटल देशभक्ती मोठ्या प्रमाणावर उफाळून आल्याचं पाहायला मिळालं. अर्थात त्यात मोदींपासून ते भाजपच्या नेत्यांमध्ये निरनिराळी वक्तव्य करण्याची जणू स्पर्धाच रंगल्याच पाहायला मिळालं. त्यात कहर म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी तर थेट बालाकोटमध्ये भारतीय वायुदलाने तब्बल २५० दहशदवादी मारल्याचा दावा केला होता. त्याला कोणताही पुरावा स्वतः भारतीय लष्कराने किंवा वायुदलाने देखील दिला नव्हता. मात्र ते विचारणाऱ्या प्रत्येकाला भाजप समर्थकांनी राष्ट्रद्रोही घोषित करण्याचं शौर्य दाखवलं होतं.
अर्थात राष्ट्रभक्ती प्रत्येकात असणं गरजेचं आहे, मात्र ती नितळ आणि चिरंतर असावी इतकीच अपेक्षा. मात्र लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसाआधी देशभर उफाळून आलेली देशभक्ती ही केवळ निवडणुकीत राजकीय फायदा होण्यापुरतीच मर्यादित राहिली असंच म्हणावं लागेल. सत्ताधाऱ्यांनी तर त्यात भावनिक मुद्यावर निरनिराळ्या वृत्त वाहिन्यांवर पेड सर्वे आणि देश मोदींच्या भक्तीत तल्लीन झाल्याच्या बातम्या देखील पेरल्या आणि एकवेळ उपाशी राहू पण पाकिस्तानला धडा शिकवा अशा भावनिक जाळ्यात देशातील तरुण गुरुपटून ठेवला होता. वास्तविक पाकिस्तानचं काय नुकसान झालं हा आजही संशोधनाचा विषय आहे. मात्र समाज माध्यमाच्या आडून तरुणांचा मेंदूच डिजिटली ताब्यात घेतला गेला होता, याचा थांगपत्ता त्या तरुणांना आजही लागलेला नाही आणि पुढील १५ वर्ष तरी त्यांच्या ते ध्यानात येणार नाही.
सोमवारपासून भारतीय वायुदलाच AN-३२ विमान अरुणाचल प्रदेशाच्या सीमेवर म्हणजे भारत चीनच्या सीमेवर अचानक बेपत्ता झालेलं विमानाचा अजूनही थांगपत्ता लागेलला नाही. त्यात भारतीय वायुदलाचे तब्बल १३ जवान होते. धक्कादायक म्हणजे पंतप्रधान, संरक्षण मंत्री ते गृहमंत्री यापैकी एकाने देखील देशाला या विषयावर मोजक्या शब्दात का होईना संबोधित केलं नाही. कारण एकच असावं की देश प्रश्न विचारेल. दुसरी खेद जनक गोष्ट म्हणजे एअर स्ट्राईक बद्दल धादांत कपोकल्पित बातम्या पेरणारी ठराविक भारतीय प्रसार माध्यमं मूग गिळून शांत आहेत. रात्रीच्या अंधारात एअर स्ट्राईक कसा झाला याचा पूर्ण शो आयोजित करणारी प्रसार माध्यमं आज या बाबतीत खोलवर जाण्यास तयार नाहीत. अर्थात देशप्रेम सध्या AN-३२ ऐवजी धोनीच्या हँडग्लोव्जवर केंद्रित झालं आहे आणि ती जवाबदारी प्रसार माध्यमं चोख बजावत आहेत. पण अरुणाचल प्रदेशात आणि चीनच्या सीमेजवळ AN-३२ अचानक कसं गायब झालं असे शुल्लक प्रश्न सध्या प्रसार माध्यमांना महत्वाचे वाटत नसावेत.
देशाच्या हद्दीतच पडलं आहे असं समजावं तर शोधमोहिमेत सुखोई सारखी आधुनिक विमानं वापरून सुद्धा अजून सुगावा लागलेला नाही हे विशेष. त्या कुटुंबांची काय अस्वस्था झाली असेल हा प्रश्न निवडणुकीच्या काळातील देशभक्तांना सतावत नाही आणि त्यात काहीच नवल नाही. ३ जून रोजी आसामहून निघालेलं वायुदलाच AN-३२ अरुणाचलच्या दिशेने निघालं होतं. मात्र ३५ मिनिटांनी अचानक बेपत्ता झालं आणि आजही त्याचे अवशेष सापडलेले नाही त हे विशेष. रशियन बनावटीचे हे विमान अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथील एडवांस लँडिंग ग्राउंड पर्यंत जात होतं. मेचुका हे अरुणाचल प्रदेशातील आणि चीनच्या सीमेला लागूनच असलेल्या सियांग जिल्ह्यातील एक छोटंसं शहर आहे. दरम्यान वायुदलाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार AN-३२ विमानाने जोरहाट येथून सोमवारी ठीक १२.२५ मिनिटांनी आकाशात झेप घेतली आणि १ वाजण्याच्या सुमारास त्याचा रडारशी संपर्क तुटला आणि त्यानंतर ते बेपत्ताच आहे.
मात्र त्यानंतर देशातील देशभक्त अजून शांत आहेत आणि ते शांतच राहतील याची जवाबदारी सरकारने प्रसार माध्यमांना शांत करून घेतली असावी. अशीच जवाबदारी २०२४ पर्यंत पार पडली जाईल आणि अचानक २०२४ पूर्वी ती देशभक्ती पुन्हा उफाळून आणली जाईल अशीच शक्यता आहे. कारण जर चीनने काही आगळीक केलीच असेल तर त्यांना सीमापार घुसून धडा शिकवण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही आणि आपण युद्धात चीन इतके सक्षम नाही याची शूरवीर सत्ताधाऱ्यांना जाणीव असावी असंच म्हणावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं