अशोक गेहलोत काॅंग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्विकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि आज देखील ते त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे वृत्त आहे. दरम्यान काँग्रेसला आता गांधी घराण्याव्यतिरिक्त नवा अध्यक्ष मिळणार असून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
राहुल गांधींनी महिनाभराचा अवधी देत नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यास पक्षाला सांगितलं होतं. परंतु काँग्रेसचा नवा अध्यक्ष गांधी परिवारातील नको अशी अट राहुल गांधींनी ठेवली होती. दरम्यान, काँग्रेस लवकरच नव्या अध्यक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं