'भारत-बंद' मध्ये माणुसकी हरवली, तान्ह्या बाळाने प्राण सोडले

नवी दिल्ली : तान्ह्या बाळाची माउली आंदोलनकर्त्यांना अडवलेली रुग्णवाहिका सोडण्यासाठी विनवण्या करत होती, परंतु आंदोलनकर्त्यांनी सरकारविरुद्धच्या रागात ‘भारत बंद’ करता-करता, तान्ह्या बाळाचे उपचाराअभावी ‘श्वासच बंद’ केले आणि सर्वांचा माणुसकीवरचा विश्वासच उडाला.
दलित अत्याचारविरोधी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात देशभरातील दलित संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. देशभर पुकारलेल्या भारत बंदला हिंसक वळण लागून अनेक जणांनी आपले प्राण ही गमावले आहेत. उत्तरेकडील राज्यात आणि विशेष करून युपी – बिहारमध्ये याची अधिक झळ पाहायला मिळत आहे.
एका नवजात बालकाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच आंदोलकांनी ती रग्णवाहिका अडवून धरली. जन्म झाल्यानंतर लगेचच त्या तान्ह्या बाळाची प्रकृती खालावल्याने त्याचे पालक त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून हाजीपूर येथील रुग्णालयात घेऊन जात होते. आंदोलकांनी रस्त्यावर टायर्स आणि इतर वस्तू टाकून रस्त्यावर अडथळे निर्माण केले होते. तान्ह्या बाळाची माउली आंदोलनकर्त्यांना अडवलेली रुग्णवाहिका सोडण्यासाठी विनवण्या करत होती, परंतु, आंदोलकांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही. या आंदोलकर्त्यांनी रुग्णवाहिकेचा रस्ता तसाच रोखून धरला. अखेर उपचाराअभावी त्या तान्ह्या निर्दोष बाळाने त्या माऊलीच्या कुशीतच आपले प्राण गमावले.
मात्र या प्रकाराने सर्वच थरातून आंदोलकांबद्दल चीड व्यक्त करण्यात येत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं