चिकनच्या नावाने खवय्यांना चक्क कौवा बिर्याणी विकायचे; कुठे ते वाचा सविस्तर

चेन्नई: जर तुम्ही रोजच्या प्रवासात रस्त्याच्या कडेला स्वस्त आहे म्हणून चिकन बिर्याणी खात असाल तर जरा काळजी घ्या. कारण मागच्या काही दिवसांपासून अनेक शहरांमध्ये कोंबड्यांच्या नावावर कावळे आणि कुत्र्यांचे मांस मिसळून बिर्याणी विकण्याचे संतापजनक प्रकार सुरु असल्याचं उघड झालं आहे.
कारण तामिळनाडूतील रामेश्वरममधून तसंच एक प्रकरण समोर आलं आहे. विशेष म्हणजे प्रतिदिन शेकडो ग्राहक ही स्वस्त बिर्याणी खात होते. मात्र अचानक अन्न आणि औषध विभागाने रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीवर धाड टाकली तेव्हा अधिकारी देखील हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. कारण गाडीवर स्वस्त दरात विकली जाणाऱ्या चिकन बिर्याणीत कोंबडी ऐवजी चक्क कावळ्यांचे मांस वापरलं जात होतं.
संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यावर स्थानिक पोलिसांनी येथे दोन विक्रेत्यांना अटक केली आणि त्यांच्याकडून तब्बल १५० मृत कावळे जप्त केले आहेत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वरम मंदिरात आलेल्या भाविकांच्या संशयावरून कावळ्यांच्या नावावर कोंबडीची विक्री उघडकीस आली होती. वास्तविक, येथे भाविक दररोज कावळ्यांना प्रेमाने खाऊ घालतात, पण मागील काही दिवसांपासून त्यांना बरेच कावळे मृत सापडत होते. त्यावेळी काही लोकं औषधांचा प्रयोग करून कावळ्यांची शिकार करत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं आणि त्यानंतर पुढील तपास सुरु झाला होता.
मात्र पकडलेल्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार कावळ्यांची शिकार करणारे तेच कावळे शहरातील अनेक भागात विकत असल्याचं समोर आलं आणि असे प्रकार इतरत्र देखील सुरु असण्याचा संशय बळावला आहे. त्यासाठी पहिल्यांदा मंदिराच्या आसपासच्या बिर्याणी सेंटरवर धाडी टाकण्यात आल्या आणि हा प्रकार उघड झाला. विक्रेता दुकानदार कावळ्यांचे मांस चिकन लॉलीपॉप आणि चिकन बिर्याणी म्हणून विकत होते आणि स्वस्त असल्याने त्यांची चांगली कमाई होतं होती.
कोंबडी आणि कावळे यांचे मांस कोंबडी आणि मटणाच्या नावावर विकले जाण्याची ही पहिली वेळ नाही, अशी माहिती आहे. यापूर्वी २०१८ मध्ये अन्न आणि औषध विभागाने मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे छापा टाकून कुत्रा आणि मांजरीचे मांस विकणाऱ्यांना अटक केली होती.
Web Title: Biryani made with crow meat instead chicken got in FDA raid.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं