सनी देओल प्रचारात गदर सिनेमाचे डायलॉग मारून गेला; नंतर फिरकलाच नाही

पठाणकोट: अभिनेते-खासदार सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर पठाणकोटमध्ये ठिकठिकाणी झळकले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत गुरुदासपूर मतदारसंघातून ते निवडून आले होते. मात्र, निवडून आल्यानंतर एकदाही ते मतदारसंघात दिसले नाहीत. त्यामुळं मतदारसंघातील लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, ते बेपत्ता असल्याचे पोस्टर लावले आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत सनी देओल गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सनी देओल भाषणात केवळ गदर सिनेमाचे डायलॉग मारून गेला आणि निवडून देखील आला. मात्र त्यानंतर मात्र तो गुरुदासपूर मतदारसंघात फिरकला देखील नाही. त्यामुळे मतदारसंघात मतदार अत्यंत संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.
लोहड़ी के इस पावन अवसर पर आप सभी को हार्दिक शुभकामनाए।#HappyLohri pic.twitter.com/pBGpj6vbGU
— Sunny Deol (@iamsunnydeol) January 13, 2020
त्यामुळं मतदार प्रचंड नाराज झाला आहे. त्यांनी पठाणकोट रेल्वे स्थानकाच्या परिसरात सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर लावले आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, एका वर्षापूर्वी सनी देओल यांना निवडून दिले होते. ते मुंबईतील आहेत आणि येथील लोकांना ते विकासाच्या दिशेनं घेऊन जातील अशी अपेक्षा होती. याशिवाय ते विकासकामं करतील असंही वाटलं होतं. मोठमोठे प्रकल्प आणून बेरोजगारी कमी करण्यात मदत करतील. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी एकदाही मतदारसंघाचा दौरा केला नाही. त्यामुळं आपली फसवणूक झाल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी गुरुदासपूर मतदारसंघात बोलताना मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी देखील मागील ५ वर्षांत मोदींनी दिलेल्या आश्वासनांपैकी पूर्ण करण्यात आलेलं एक तरी आश्वासन लोकांना सांगावं असं थेट आव्हान त्यांनी नरेंद्र मोदी यांना दिलं होतं. त्यानंतर, मोदींनी गुरुदासपूर येथे घेतलेल्या प्रचारसभेत उपस्थितांशी संवाद साधताना काँग्रेसवर टीका केली होती.
गुरुदासपूर येथील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की, ‘देशातील इतर राज्यांप्रमाणे काँग्रेसने पंजाबमध्येही कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु, दीड वर्षांनी काय परिस्थिती आहे, ते सर्वांनाच चांगले माहीत आहे. राष्ट्रीय काँग्रेसने भूतकाळात अशा लोकांचं कर्ज माफ केलं होतं जे कधी शेतकरीच नव्हते. काँग्रेसने केवळ गरिबी हटवण्याच्या बहाण्याने अनेक दशकं देशाला लुटलं आणि आता सुद्धा कर्जमाफीच्या नावाने ते तेच करत आहेत’ अशी टीका केली होती.
Web Title: BJP MP and Bollywood actor Sunny Deol Declared missing posters in Guarudaspur constituency in Punjab.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं