कर्नाटक: त्या आमदारांची धमकी..ही मंत्रालय द्या अन्यथा...येडियुरप्पा तातडीने दिल्लीला

बंगळुरू: कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आणि आपली जागा निश्चित करणाऱ्या मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. येडियुरप्पा यांनी विजयी आमदारांना मंत्रीपदाची ऑफर दिली पण त्यांच्या अपेक्षा मोठ्या झाल्या आहेत आणि आमच्यामुळेच सरकार टिकणार आहे त्यामुळे त्यांनी मोठ्या मागण्या पुढे रेटल्या आहेत. आमदारांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे असं वृत्त आहे. त्यांना केवळ मंत्रीपदावरच आनंद नाही, तर त्यांना मोठी आणि महत्वाची खाती हवी आहेत आणि ती दिल्यास पक्षातील मोठ्या नेत्यांना खुर्च्या खाली कराव्या लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपने एकूण १२ जागा जिंकल्या. या जागांवर विजय मिळविणारे नेते असे आहेत की ज्यांनी कॉंग्रेस किंवा जेडीएसमधून बंड केले आणि भाजपच्या समर्थनार्थ पुढे आले. येडियुरप्पा यांचे सरकार वाचविण्यासाठी ७ आमदारांची गरज होती, त्यामुळे या निकालांनी येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारला बळ दिले. हेच कारण होते की निकाल येताच येडियुरप्पा यांनी विजयी आमदारांना मंत्री करण्याची घोषणा केली.
निकाल लागल्यानंतरच येडियुरप्पा म्हणाले की विजयी झालेल्या १२ पैकी ११ आमदारांना कॅबिनेट मंत्री केले जाईल. मात्र, येडियुरप्पा यांच्या या ऑफरवर नवनिर्वाचित आमदार खूश नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गृह, पीडब्ल्यूडी, पाटबंधारे आणि ऊर्जा यासारखी महत्वाची खाती देण्यात यावीत, अशी मागणी आमदार करत आहेत.
मजबूत मंत्रालयांची मागणी का आहे?
नवनिर्वाचित आमदारांनीही त्यांच्या मागणी मागील कारण सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आमदारांचा असा विश्वास आहे की येडियुरप्पा सरकार स्वबळावर चालत आहे, अशा परिस्थितीत त्यांना मजबूत मंत्रालये दिली जावीत. एवढेच नव्हे तर निवडणूक हरलेल्या तीन नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये अशी मागणी आमदारांकडून केली जात आहे. पोटनिवडणुकीत एमटीबी नागराज, विश्वनाथ आणि रोशन बेग यांचा पराभव झाल्याने त्यांचा देखील विचार करून पुनर्वसन करावं.
बेंगळुरूमध्ये आज मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि नवनिर्वाचित आमदार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक आहेत. असं म्हटलं जात आहे की त्यानंतर येडियुरप्पा गुरुवारी दिल्ली गाठतील आणि आमदारांच्या मागणीवर हाय कमांडशी चर्चा करतील. आमदार आपली मागणी नाकारण्यास तयार नाहीत असे सांगितले जात आहे, अशा परिस्थितीत येडियुरप्पा यांच्यासमोर स्थिर सरकार चालवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र अशा परिस्थितीत येडियुरप्पा नवनिर्वाचित आमदारांची मागणी पूर्ण करण्यासाठी कोणता मार्ग अवलंबतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
BJPs Challenge Run Stable Government in Karnataka State Chief Minister BS Yeddyurappa Left for Delhi Immediately
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं