हे काय? सीबीआयकडून सीबीआयच्या मुख्यालयावर छापेमारी

नवी दिल्ली : सीबीआयकडून मुख्यालयाची इमारत सील करण्यात आले असून कोणीही अधिकारी किंवा बाहेरील परिचित व अपरिचित व्यक्तीला आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. केंद्रीय गुन्हाअन्वेषण विभागात सध्या वरिष्ठ पदस्थांमध्ये तीव्र संघर्ष उफाळून आला आहे. दरम्यान, रात्री मुख्यालयात छापा टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार, मुख्यालयाची आणि विशेष करून संबंधित २ मजले पूर्णपणे सील करण्यात आले असून कोणत्याही अधिकारी किंवा बाहेरील व्यक्तीला आत जाण्याची परवानगी नाही.
तसेच विशेष अधिकाऱ्यांची एक टीम सध्या इमारतीमध्ये हजर असून संपूर्ण कार्यालयांची मोठ्या प्रमाणावर झाडाझडती घेतली जात आहे असे वृत्त आहे. दरम्यान भारत सरकारने कडक पाऊलं उचलत सीबीआय प्रमुख आलोक वर्मा तसेच विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर धाडलं आहे. तसेच आलोक वर्मा यांच्या जागी एम नागेश्वर राव यांच्याकडे तातडीने सीबीआय प्रभारी संचालकपद देण्यात आलं आहे. केंद्र सरकारने तसे लेखी आदेशच तडकाफडकी जारी करत आलोक वर्मा यांच्या जागी एम नागेश्वर राव यांची नियुक्ती करून टाकली.
तसेच ती नियुक्ती होताच नागेश्वर राव यांच्याच नेतृत्वात सध्या सर्व छापे टाकण्यात आले आहेत. तसेच आलोक वर्मा यांच्या ११ व्या मजल्यावरील कार्यालयाची संपूर्ण झाडाझडती सुरु झाली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात दाखल एफआयरचा तपास करणारी टीम बदलण्यात आली असून डीआयजी मनोज सिन्हा यांनादेखील सक्तीच्या रजेवर धाडण्यात आलं आहे असं वृत्त आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं