अयोध्येतील राममंदिरासाठी ती जागा ताब्यात घ्या : आरएसएस

उत्तन : अयोध्येतील विवादित रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे थेट जानेवारी महिन्यात ढकलली असतानाच, आरएसएस’ने राममंदिर उभारणीबाबत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता आक्रमक पवित्र घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी आता विवादित जागेचा ताबा घेणे आणि ती संबंधित ट्रस्टकडे हस्तांतरित करणे बाकी आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने तातडीने तशी हालचाल करावी, अशी मागणी उचलून धरली केली.
उत्तन येथे सध्या आरएसएस’ची ३ दिवसांची चिंतन बैठक सुरू झाली असून, त्यात बैठकीदरम्यान राममंदिर उभारण्याबाबतच्या विषयावर आरएसएसच्या कार्यकारणीतील सदस्यांनी विचारमंथन केले त्यादरम्यान ही मागणी पुढे रेटण्यात आली आहे. दरम्यान, अयोध्येत विवादित जागेवर राममंदिर कोणत्याही परिस्थितीत बांधले जाईल, असे स्पष्ट करतानाच, राममंदिराच्या विषयाबाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणीला विलंब होत असल्याबद्दल संघाचे सहकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी बैठकीदरम्यान प्रचंड नाराजी व्यक्त केली.
अयोध्येत श्री. राममंदिर उभारले जाण्याचा मुद्दा हा भारतासाठी अभिमानास्पद आहे. कारण हा विषय राजकीय किंवा धार्मिक नाही. तसेच, हा हिंदू-मुस्लिम यांच्यातील वादाचा सुद्धा मुद्दा नाही. परंतु, काही लोक त्याला जाणीवपूर्वक धार्मिक रंग देत आहेत’, असे वैद्य यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्पष्ट केले आहे.
अखिल भारतीय कार्यकारी मंडल 31 अक्टूबर से प्रारम्भ .https://t.co/8gYtaiSryr
— RSS (@RSSorg) October 29, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं