भारतीय जवानांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले - राहुल गांधी

नवी दिल्ली, १८ जून: चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्याने सध्या देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरम्यान, या घटनेवरून आला राजकारणही सुरू झाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जवानांच्या मृत्यूवरून केंद्र सरकारला खरमरीत शब्दात जाब विचारला आहे. देशाच्या वीर जवानांना जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
ट्विटरवर व्हिडीओ शेअर करून राहुल गांधी यांनी या घटनेवरून जाब विचारला आहे, ‘’बंधु भगिनींनो चीनने भारताच्या निशस्र सैनिकांची हत्या करून एक मोठा अपराध केला आहे. माझा प्रश्न आहे की, या वीरांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले, याला कोण जबाबदार आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.
कौन ज़िम्मेदार है? pic.twitter.com/UsRSWV6mKs
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 18, 2020
दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी या दोघांनीही बुधवारी चित्रफीत प्रसिद्ध करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारला. चीनने भारताचा भूप्रदेश ताब्यात घेतला कसा? २० भारतीय जवानांना प्राण का गमवावे लागले? गलवानमधील विद्यमान स्थिती काय आहे? अजूनही आपले जवान आणि लष्करी अधिकारी बेपत्ता आहेत का? नेमके किती जवान आणि अधिकारी जबर जखमी झाले आहेत? चीनने भारताच्या कुठल्या कुठल्या भूप्रदेशावर ताबा मिळवलेला आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती सोनिया गांधी यांनी चित्रफीत संदेशात केली असून गलवानमधील सत्य पंतप्रधानांनी देशाला सांगितले पाहिजे, असे आवाहनही केले.
१५ आणि १६ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात सैनिकी स्तरावरील चर्चा सुरू असताना भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापत झाली होती. या झटापटीमध्ये भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचे ४३ सैनिक ठार झाले होते. या घटनेनंतर भारत आणि चीनमधील तणाव कमालीचा वाढलेला आहे.
News English Summary: Rahul Gandhi has asked for an answer to this incident, “Brothers and sisters, China has committed a great crime by killing unarmed Indian soldiers. My question is, who sent these heroes in the direction of unarmed danger and why, who is responsible for this? This question has been asked by Rahul Gandhi.
News English Title: China has committed a great crime by killing unarmed Indian soldiers News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं