पासवर्ड बदला! फेसबुकवर तब्बल ५ कोटी अकाऊंट हॅक, सर्वाधिक भारतीय अकाउंट

वॉशिंग्टन : फेसबुकवरील तब्बल पाच कोटी अकाऊंट हॅक झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे हॅक झालेल्या अकाऊंटमध्ये सर्वाधिक भारतीय अकाऊंटचा समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे. हॅकर्सनी फेसबुकच्या “View As” या सुविधेच्या सुरक्षेतील उणीवांचा नेमका फायदा उचलत फेसबुक अकाऊंट हॅक केल्याची माहिती स्वतः कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी प्रसिद्ध केली आहे.
फेसबुकवरील सुरक्षेच्या कारणास्तव केल्या गेलेल्या अनेक उपाययोजनेअंतर्गत अजून ४ कोटी फेसबुक अकाऊंट प्रभावित झाल्याचं झुकेरबर्ग यांनी पत्रकार परिषदेत मान्य केलं आहे. मोठ्या प्रमाणावर अकाउंट्स हॅक झालेली ५ कोटी खाती नेमकी कोणत्या देशातील आणि त्यांचा नेमका आकडा काय हे समजू शकलेलं नाही.
फेसबुकच्या अधिकृत माहितीनुसार फेसबुकचे जगभरात २ अब्जाहून अधिक वापरकर्ते आहेत आणि त्यात सर्वाधिक आकडा भारतातील असून तो २७ कोटी इतका मोठा आहे. त्यामुळेच हॅक झालेल्या अकाउंट्स मध्ये सर्वाधिक मोठा आकडा हा भारतातीलच असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं