सर्वेक्षण: केजरीवाल सरकारच्या विकासकामांमुळे मोदी-शहांच्या भाजपचा सुपडा साफ होणार

नवी दिल्ली : बहुचर्चित दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता मिळविणार हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील ७० जागांपैकी ५९ जागांवर आम आदमी पक्षाचा विजय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
‘सी व्होटर’ केलेल्या सर्वेक्षणात ‘आप’ला ५४ ते ६४ म्हणजे सरासरी ५९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्यावेळी मिळालेल्या जागांच्या तुलनेत यंदा कमी जागा मिळतील असा अंदाज आहे. तर, भारतीय जनता पक्षाला ३ ते १२, काँग्रेसला ० ते ६ अशा जागा मिळण्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. विधानसभेत सत्ता मिळविण्यासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस यंदा भोपळा फोडू शकते, असेही म्हटले आहे.
दरम्यान, “आम्ही जी विकासकामं केली आहेत, त्यावरच आम्ही मतं मागणार आहोत. जर आम्ही गेल्या ५ वर्षात तुमची कामं केली असं वाटत असेल तरच आम्हाला मत द्या. जर तुम्हाला वाटत असेल तरच आम्हाला सत्तेत पुन्हा येण्याची संधी मिळायला हवी”, निवडणुक आयोगाने तारखांची घोषणा केल्यानंतर केजरीवाल पत्रकार परिषदेत बोलत होते.
ये चुनाव काम पर होगा
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 6, 2020
Web Title: Delhi Assembly Election 2020 AAP Party will get majority says Exit Poll.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं