तुम्ही भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेता?। मग हा लेख नक्की वाचा

मुंबई, ३० जून | आयुष्यात मनाची दोलायमान स्थिती अनेकदा होते. त्यात तुम्ही खूप जास्त विचार करणारे असाल तर मग अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही (पण ज्या तुम्हाला फार मोठ्या आणि महत्वाच्या वाटत असतात) ‘हे करू की ते करू’ अशी अवस्था होते. मोठं होत असताना तर आपल्या निर्णयांची जबाबदारीही पूर्णतः आपल्यावर येते. आणि जेवढी मोठी जबाबदारी तेवढा मोठा मनावर ताण आणि त्याचे दुष्परिणाम.
काही निर्णय असे असतात ज्यामुळे आपल्या स्वतःच्या कामावर, प्रगतीवर, आयुष्यावर किंवा कुटुंबावर परिणाम होणार असतात तर काही निर्णयांमुळे आपल्या किंवा इतरांच्या आयुष्याला वेगळी कलाटणीच मिळते. अशावेळी निर्णय घेणाऱ्याची कसोटीच लागत असते. अनुभवांना मोकळेपणाने स्वीकारण्याने निर्णयक्षमता वाढते हे आपण बघतोच. ही ठाम निर्णय घेण्याची क्षमता जशी आपण एखाद्या परिपक्व व्यक्तीच्या अनुभवातून शिकू शकतो.
एकदा तुम्ही तुमच्या समस्येचा स्वीकार केलात तर त्याबद्दल अधिक विचार करणे तुम्हाला सोपे जाईल. नेमके काय प्रॉब्लेम आहेत, तुम्हाला नक्की काय हवे आहे याचा विचार करता येईल. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलून या समस्येच्या तळाला जाता येईल. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर पुढच्या वेळेला निर्णय घेताना तुम्ही सावध असाल. काय चुकते आहे, कुठे चुकते आहे याचा तुम्हाला काही प्रमाणात तरी अंदाज आलेला असेल. ज्यामुळे पुढच्या वेळेला निर्णय घेताना तुम्ही जुन्या चुका परत न होऊ द्यायचा प्रयत्न करू शकाल.
तुमचे दोन निर्णय चुकतील, चार निर्णय चुकतील…पण तसे झाले तरीही आयुष्यात गरजेचे आहे ते पुढे जाने- मूव्ह ऑन करणे. तुमच्या चुका म्हणजे तुमचे आयुष्य नाही तर या चुका म्हणजे तुम्हाला मिळालेले धडे आहेत. या अनुभवांमधून शहाणपण घेऊन पुढे चालत राहणे हिताचे आहे. आयुष्यात अनेकांचे निर्णय चुकतात ते तुमचे सुद्धा चुकले असे म्हणून तुम्ही पुढे जायला शिकले पाहिजे. सतत जर तुम्ही स्वतःला दोष देत राहिलात तर त्याचा फक्त त्रासच होईल, त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही. म्हणूनच चुकीचे निर्णय सोडून द्या पण त्यातून मिळालेले अनुभव सोबत घेऊन सकारात्मकतेने ‘मूव्ह ऑन’ करा. आणि घेतलेल्या निर्णयावर फोकस करून कामाला लागा, तोच चुकीचा निर्णय बरोबर ठरवणं हे तुमच्या हातात आहे, आणि ते तुम्ही करणार, यावर दृढ विश्वास ठेवा.
१. कोणताही निर्णय हा भावनेचा भरात कधीच घेऊ नका. जेव्हा तुमचं मन शांत होईल तेव्हाच निर्णय घ्या.
२. जर निर्णय घेतलं ही असेल तर त्याचं वर्गीकरण करा की तो निर्णय मी कोणत्या भावनेचा भरात तर नाही ना घेतला.
३. निर्णय घेतल्यावर तुमचं काम करत रहा अपेक्षा नका ठेऊ.
४. स्वतःचा घेतलेल्या निर्णयावर विश्वास ठेवा.
५. जे श्रेष्ठ लोक असतात ते आधी निर्णय घेतात आणि मग बरोबर बनवतात.
६. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं पॉइंट म्हणजे जरी तुमचा निर्णय चुकला तरी घाबरु नका कारण की चांगेल निर्णय आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपल्याकडे अनुभव असतात आणि अनुभव तेव्हाच येतात जेव्हा आपण चुकीचे निर्णय घेतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Do not take wrong decision in emotions news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं