काँग्रेसच्या राफेल जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राफेल लढाऊ विमानांच्या कराराचा मुद्दा आक्रमकपणे वापरला जात असताना याबाबत काँग्रेसने जाहिरातीत राफेलच्या प्रतिकृतीच्या वापर केल्याने निवडणूक आयोगाने त्याबाबत आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या ९ पैकी ६ जाहिरातींवर आयोगाने आक्षेप घेतला आहे. ज्यामध्ये राफेलबाबत असलेल्या जाहिरातीचाही समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसकडून ९ जाहिराती निवडणूक आयोगाला परवानगीसाठी याआधी पाठविण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये एकूण ६ जाहिरातींवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. राफेल करार प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे निवडणूक प्रचारात त्याचा वापर करणे योग्य राहणार नाही. राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्याने निवडणूक आयोगाने हा आक्षेप घेतला आहे.
मध्य प्रदेश निवडणूक आयोगाचे प्रमुख वीएलके राव यांनी सांगितले की, जर काँग्रेसला निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह असेल तर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागावी असा सल्ला दिला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण राजकीय आरोपांनी ढवळून निघालं असताना काँग्रेसने राफेलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलं आहे. त्यामुळे मध्य प्रदेश निवडणूक आयोगाने घेतलेल्या आक्षेपावर काँग्रेस केंद्रीय पातळीवर अपील करण्याची शक्यता आहे.
राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांच्या खिशात तब्बल ३०,००० कोटी रुपये घातल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अनिल अंबानी यांच्या फायद्यासाठी विमान बनविण्याचं कंत्राट त्यांना देण्यात आलं असा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना चौकीदार चोर है अशी टीका केली होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं