आठवलेंना पुन्हा मंत्रिपदाची शपथ; मागील ५ वर्ष त्यांनी काय विकास कामं केली ते रहस्य

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ६५ मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये आधीच्या २१ मंत्र्यांना नारळ देण्यात येणार असून २० तरी नवीन चेहरे असण्याची शक्यता आहे. मात्र, रामदास आठवले मंत्रिपदासाठी शहांच्या फोनची वाट पाहत होते. अखेर आठवलेंना शहांचा फोन आला असून अद्याप मंत्रीपदाबाबत माहिती समोर आलेली नाही. याआधी देखील त्यांना मंत्रिपद भेटलं असलं तरी त्यांच्याकडे असलेल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी नेमकी कोणती विकास कामं केली हा मुळात संशोधनाचा विषय आहे. मागील ५ वर्ष ते प्रसार माध्यमांना केवळ फुटकळ प्रतिक्रिया देणं आणि संसदेत किंवा संसदेच्या बाहेर श्रोत्यांना मनावर दगड ठेवून ऐकाव्या लागणाऱ्या शेरोशायऱ्या दिल्याचे मतदाराला ज्ञात आहे. त्यामुळे पुढील ५ वर्ष देखील ते वेगळं काही करणार नाहीत अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.
रामदास आठवलेंना मंत्रीपद मिळणार या आशेने सकाळपासून हार-तुरे घेऊन कार्यकर्ते जल्लोषाच्या तयारीत होते. मात्र, आठवलेंना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा फोन न आल्याने या आशेवर विरजण पडल्याचे जाणवत होते. अखेर आठवलेंना शहा यांनी फोन केल्याचे समजत आहे. आठवले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ४.३० वाजता भेट घेणार आहेत. याचवेळी मोदींच्या मंत्रीमंडळातील समाविष्ट होणारे खासदारही मोदींची भेट घेणार आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं