गौतम गंभीरविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

नवी दिल्ली : दिल्लीतील भाजपचे उमेदवार गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ झाली आहे. गौतम गंभीरच्या विरोधात दुसरी तक्रार नोंदवण्यात आलेली आहे. गौतम गंभीरच्या विरोधात दोन वेळा मतदान यादीत नाव असल्याच्या मुद्द्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांनतर त्यांच्यावर परवानगी न घेता प्रचारसभेचे आयोजन केल्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
गौतम गंभीर यांचे नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्याच्या आरोप करत त्यांच्याविरोधात ‘आप’ने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यावर १ मे रोजी सुनावणी करण्यात येणार आहे. त्यानंत आता शुक्रवारी पूर्व दिल्लीमधून गंभीरने कोणतीही परवानगी न घेता प्रचारसभा घेतली. या विरोधात निवडणूक आयोगाकडे इतर पक्षांकडून तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे आयोगाने याबाबत गंभीर दखल घेत दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांना गंभीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं