मोदी-शहांचा अविचारी मास्टरस्ट्रोक, विधानसभेत 'पॉर्न' बघणारा आमदार कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री पदी

कर्नाटक : सध्या संपूर्ण भारतीय जनता पक्षावर पकड असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे धक्कादायक निर्णय पाहून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे. कारण कर्नाटक विधानसभेचे कामकाज सुरू असताना सभागृहात मोबाईलवर पॉर्न पाहणारे तत्कालीन मंत्री लक्ष्मण सवदी यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लावल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा सरकारवर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, येडियुरप्पा यांनी जी. एम. कारजोल, डॉ. अश्वत्थ नारायण सी. एन. आणि लक्ष्मण सवदी यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. पॉर्न पाहण्याचा प्रकार विधानसभेत घडला आहे , सभागृहाबाहेर नाही, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. सवदी हे गेल्या निवडणुकीत पराभूत झाले, असे असतानाही त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले, भारतीय जनता पक्षाला या बाबत लज्जा वाटत नाही, असे सिद्धरामय्या म्हणाले.काँग्रेस आणि जेडीएसमधील १७ आमदार फोडण्यामध्ये सवदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
दरम्यान, २०१२ मध्ये कर्नाटकच्या विधानसभेतच पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या त्या विवादित आमदारांना भाजपने पुन्हां तिकीट दिल्याचे समोर आलं होतं. देशात महिलांविषयक गंभीर विषयांनी तोंड काढलं असताना आणि त्यात अनेक भाजप आमदार-खासदार अडकले असताना मोदी आणि शहांनी त्याबाबत कोणतही गांभीर्य नसल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळेच ज्येष्ठ पत्रकार नलिनी सिंग यांनी भारतीय जनता पक्षावर त्यावेळी सडकून टीका केली होती.
पत्रकार नलिनी सिंग यांनी भाजपाला ट्विट करून लक्ष केलं होतं. देशभरात आधीच महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं थांबता थांबत नाहीत. त्यातील काही प्रकरणात तर भाजपचे आमदारच आरोपी आहेत. त्यात भाजपने कर्नाटक निवडणुकीची चौथी यादी जाहीर केली असून, त्यात पुन्हा त्या तीन आमदार आणि मंत्र्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
नेमकं काय होत ते २०१२ मधील प्रकरण;
२०१२ मध्ये कर्नाटकात भाजप सत्तेत होती. त्यावेळी भाजपचे आमदार आणि मंत्री लक्ष्मण सवदी विधानसभेतील कामकाज चालू असतानाच मोबाईलवर पॉर्न बघत होते. त्यावेळीच कर्नाटकचे तत्कालीन पर्यावरण मंत्री जे. कृष्णा पालेमर आणि महिला व बालविकास मंत्री सी. सी. पाटील हे सुद्धा लक्ष्मण सवदी यांच्या सोबत विधानसभेतच पॉर्न व्हिडिओ पाहू लागले. त्यावेळी कर्नाटक विधानसभेत दुष्काळासारख्या गंभीर विषयावर चर्चा सुरु होती.
त्यावेळी उपस्थित पत्रकारांच्या ते नजरेत आलं आणि ते कॅमेऱ्यात कैद करण्यात आल होत. त्यानंतर कर्नाटकात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं होत. त्यानंतर मंत्री लक्ष्मण सावादी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, पर्यावरण मंत्री जे. कृष्णा पालेमर हे मला मोबाईलवर युरोपियन देशात एका महिलेवर झालेल्या गॅंगरेपचा व्हिडिओ दाखवत होते, परंतु तो पॉर्न व्हीडीओ नव्हता असं न पटणार स्पष्टीकरण दिल होतं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं