स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांना त्यांच्या चिमुकलीने दिलेला निरोप पाहून मन भारावलं

भारत-पाकिस्तान तणावा दरम्यान भारतीय वायू दलाचे हेलिकॉप्टर काश्मीरमध्ये क्रॅश झाले आणि त्यात स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे शहीद झाले. जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज नाशिकमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
तत्पूर्वी शहीद निनाद मांडवगणे यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. याठिकाणी जेव्हा शहीद निनाद मांडवगणे यांची पत्नी त्यांच्या चिमुकलीला घेऊन दाखल झाल्या तेव्हा वातावरण अगदी भावूक होऊन गेलं. आपल्या बाबांना अखेरचा निरोप देण्यासाठी कसा सॅल्युट करायचा, हे छोटीला सांगतानाचा क्षण तिथे उपस्थित असलेल्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता.
निनाद यांचा जन्म 1986 साली झाला. त्यांचे पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण भोसला मिलिटरीमध्ये तर अकरावी आणि बारावीचं शिक्षण औरंगाबादच्या सैनिकी संस्थेत झालं. नंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केलं. मग हैदराबाद ट्रेनिंग कमिशनमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, 2009 मध्ये भारतीय वायू दलात स्क्वॉड्रन लीडर पदावर ते रुजू झाले. गुवाहाटी, गोरखपूर इथे सेवा करुन एक महिन्यापूर्वीच श्रीनगर इथे त्यांची बदली झाली होती. पण तिथेच त्यांना वीरमरण आलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं