राजस्थानात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि व्हिडीओ शूट : संतापाची लाट

राजस्थान : विकृती थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आधीच कठुआ आणि उन्नाव मधील बलात्काराच्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली असताना आता राजस्थानमध्ये सुद्धा एका तरुणीवर तीन तरुणांनी बलात्कार करत त्याचा व्हिडियो शूट करून तो सर्वत्र व्हायरल केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव मधील सामूहिक बलात्काराची प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देश भरात आधीच संतापाची लाट उसळली आहे. त्यातच अजून एक भयंकर घटना राजस्थानात घडली आहे. भरतपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आणि बलात्कार करतानाचे व्हिडीओ शूट करत ते व्हायरल केल्याचे समोर आलं आहे.
विकृत बलात्कारी इतके निर्धास्त झाले आहेत की, सामूहिक बलात्कार करतात आणि त्याचा व्हिडीओ सुद्धा बिनदिक्कत समाजमाध्यमांवर व्हायरल करत आहेत. पीडित मुलीच्या वडिलांनी हलैना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक उत्तर प्रदेशाला रवाना झालं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं