न्यायालयाकडून धक्का! गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द

गांधीनगर, १२ मे: गुजरात सरकारला मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानं धक्का बसला. गुजरात उच्च न्यायालयानं गैरवर्तणूक आणि फेरफार केल्याच्या आरोपावरून ढोलका विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द ठरवली. त्यामुळे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळात असलेले कायदामंत्री भूपेंदरसिंह चुडासामा यांची आमदारकी गेली आहे. काँग्रेसचे उमेदवार आश्विन राठोड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयानं हा निकाल दिला.
यावर गुजरातच्या रुपानी सरकारमध्ये कायदे मंत्री असलेल्या चुडासमा यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. तर उप मुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले की, आम्ही कायदेशीररित्या आव्हान देणार आहोत. तसेच प्रदेशाध्य़क्ष, मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय नेत्यांसोबत चर्चा केली जाणार आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालाचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे. “गुजरातच्या कायद्या मंत्र्यांला बेकायदेशीरपणे विजयी घोषित करण्यात आलं होतं. गुजरात उच्च न्यायालयानं हा निकाल अवैध ठरवत निवडणूक रद्द केली आहे,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते शक्ती सिंह यांनी व्यक्त केली. दरम्यान, मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या सरकारमध्ये भूपेंद्रसिंह चुडासामा हे दोन खात्यांचे मंत्री आहेत. कायदा मंत्र्यांबरोबर शिक्षण मंत्र्याची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. चुडासामा यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये चुडासमा यांनी चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकल्याचा आरोप राठोड यांनी केला होता. मतमोजणी सुरु असताना बॅलेट पेपरच्या मोजणीवेळी फेरफार करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर तेथील निवडणूक अधिकारी धवल जॉनी यांची बदली उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे करण्यात आली होती. मंत्री चुडासमा यांनी या जागेवर केवळ ३२७ मतांनी विजय मिळविला होता.
News English Title: Gujarat High Court Invalidates Law Minister Bhupendrasinh Chudasamas Poll Win News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं