शिमल्यात पावसाच थैमान, जनजीवन विस्कळीत

शिमला : हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमल्यात काही दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशात २०७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर राजधानी शिमल्यात ४७.७ मी.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
सिरमौर जिल्ह्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे पाणी साचत असून आणि अधिक भर म्हणजे भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उद्याही तुफान पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे हिमाचल प्रदेशातील शिमलामध्ये ५१ रस्ते तर मंडीमध्ये २२ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३०५ पूर्णपणे ठप्प झाले आहे. आतापर्यंत संपूर्ण राज्यात १४५ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे सतलज, ब्रम्हगंगा व पार्वती नदीला पूर आल्याने स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं