BLOG: एक पत्र...एका सर्वसामान्य मुलीचं...ह्या समाजासाठी

प्रिय समाज! अप्रिय लिहिलेलं वाईट दिसेल म्हणून प्रिय! पुन्हा एकदा…वाईट दिसेल? कोणाला? समाजाला की चार लोकं काय म्हणतील त्यांना? आपल्या तथाकथित सुसंस्कृत समाजाला मुलगी जन्माला आल्या पासून चार लोकं काय म्हणतील, ह्याचीच चिंता जास्त असते. ह्या चार लोकांच्या म्हणण्याला किंमत देताना त्या मुलीच्या मनाचा कोणीच विचार करीत नाही. आताच्या समाजात स्त्रियांचा आदर करा, त्यांचा मान राखा आणि अशी कितीतरी स्त्रिसक्षमतेची वाक्य आपण ऐकतो, वाचतो, सोशल मीडियावर आपण ह्या मताशी किती सहमत आहोत हे दाखवायला शेअर सुद्धा करतो. पण जेव्हा खरोखर अन्याय घडत असेल मग तो फार मोठ्या स्तरावरचा नसला तरी देखील कितीजण त्याला विरोध करतात, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. नुकतीच उन्नाव बलात्कार प्रकरणाबद्दल बातमी वाचली. सुप्रीम कोर्टाने बलात्कार पीडितेला रू. २५ लाख भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
पण केवळ आर्थिक मदत केल्याने, कुटुंबाला झालेला त्रास, मानसिक धक्का व समाजाप्रति निर्माण झालेला द्वेष नष्ट होणार आहे का? नाही! ह्याला कारण देखील समाजच आहे. कारण विकृत समाजवृत्ती व त्याला न झालेला विरोध ह्याला संपूर्ण समाजच कारणीभूत आहे. आधी स्त्रीभ्रूण हत्या, मग बलात्कार आणि ह्यातून प्रकट होणार पुरुषी अहंकार! ती मला नाही म्हणतेच कशी? आता दाखवतो तिला मी काय आहे ते किंवा माझ्या पोटी मुलगी, छे! मला मुलगाच होणार हा पुरुषी अहंकार. असं म्हटलं जातं की बलात्कार हा स्त्री च्या शरीरावर होण्याआधी तिच्या मनावर होतो. आणि तो केवळ त्या एकट्या स्त्रीच्या मनावर होत नाही, तर त्याचे पडसाद व भिती समाजातील लाखो स्त्रिया व मुलींच्या मनावर उमटतात. ह्या झाल्या मोठ्या स्तरावरील घटना. पण आपल्या दैनदिन जीवनात अशा अनेक गोष्टी घडतात जेव्हा छोट्या जोक मधून सुद्धा हा समाज स्त्रियांची मने दुखावतो.
स्त्रियांवषयी समाजात निर्माण केलेल्या कितीतरी नाममात्र रुढी आहेत ज्याने स्त्रीचा अवमान होतोच. उदाहरणार्थ, स्त्रियांना तयार व्हायला कितीतरी वेळ लागतो. हेच वाक्य प्रत्येक चित्रपटात, पुस्तकांमध्ये, मालिकांमधून प्रत्येक वेळी दाखवलं जातं. काही स्त्रियांना लागत असेल ह्यात काही संशय नाही, पण म्हणून प्रत्येक स्त्रीला ह्यासाठी सतत जोक मार्फत टोमणे मारणे कितपत योग्य आहे? त्याचप्रमाणे, स्त्रियांचा आवडता रंग गुलाबी असलाच पाहिजे, असं का? स्त्रियांच्या भावना, आवडी- निवडी, सवयी ह्यावरून प्रत्येक वेळी जोक केले पाहिजेत का?
ह्या गोष्टी जरी छोट्या असल्या, तरी देखील त्या अनेकांची मने दुखावली जातात. जोक आहे, सोडून दे असं म्हणून किती काळ आपण त्याच जोक वर हसणार आहोत, आणि शेवटी स्त्री हा एक हसण्याचा विषय करणार आहोत. पुरुषांनाही अडचणी असतात, मान्य आहे, पण त्यावर समाजात का बोललं जात नाही? कारण हा पुरुषप्रधान संस्कृती मान्य समाज आहे. ह्या समाजात अजूनही स्त्रियांनी बाहेर जाऊन व्यवसाय करणे व पुरुषांनी घर सांभाळणे ह्या संकल्पनेला मान्यता नाही. ती मान्यता लवकरच यायला हवी, आणि तसं घडलं तरच समाज प्रगती करेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं