How is the जोश? भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये २०० - ३०० दहशदवादी ठार झाल्याचा अंदाज

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे भारतीय राखीव दलावर झालेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देत आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भारतीय वायुदलाने पाकिस्तान स्थित पाक व्याप्त काश्मीर मध्ये असलेल्या जैश-ए-मोहम्मद च्या प्रशिक्षण तळावर हल्ला केला. हा हल्ला प्रचंड मोठा असून १२ मिराज-२००० विमानांनी एकत्रित १००० किलोचा बॉम्ब टाकून एअर स्ट्राईक केल्याचे वृत्त आहे.
या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. तत्पूर्वी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात २०० – ३०० दहशदवाद्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोबतच कच्छ बॉर्डर जवळ भारतीय लष्कराने पाकिस्तानचे ड्रोन विमान देखील उध्वस्थ केल्याचे वृत्त आहे.
परंतु पाकिस्तान हवाई दलाने काही वेगळीच कथा रंगवत पाकची फायटर विमानं येताच भारतीय विमानांनी पळ काढल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते पाकिस्तानी विमानं येताच भारतीय वायुदलाने रिकाम्या जागी बॉम्ब पाडून पळ काढला.
दरम्यान, तब्बल २१ मिनिटे वायू दलाचे विमान पाकमध्ये होते. एका विमानात ४८ बॉम्ब होते असे प्राथमिक वृत्त आहे. पण याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हल्ल्याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्याचे माध्यमातून वृत्त येत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं