भाजप स्वबळावर सत्तेत आल्यास शिवसेनेची अवस्था पुन्हा रडकुंडीची होणार?

मुंबई : सत्तेत येण्यासाठी भाजपने मित्र पक्षांना जवळ केलं खरं आणि शिवसेनेने देखील भाजपाला आपल्याशिवाय गत्यंतर नाही असं वातावरण निर्माण केल्याचे चित्र होते. २०१४च्या निकालानंतर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेनेची अवस्था सत्तेत असून देखील नसल्यासारखीच असल्याचे पाहायला मिळाले. मात्र सध्या सुरु असलेले निकालाचे कल पाहता भाजप बहुमताने पुन्हा सत्तेत येईल अशी अशी चिन्हं आहेत.
त्यामुळे जर तसे झाल्यास शिवसेनेची अवस्था पुन्हा बिकट होईल, कारण शिवसेने वाचून त्यांचं कोणतही राजकीय गणित अडणार नाही. परिणामी भाजपाची गुर्मी अधिक वाढून ते शिवसेनेला पुन्हा संपवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतील अशी शक्यता अनेक राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेशी फारकत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवेल, कारण असं ही काँग्रेसची अवस्था राज्यात अत्यंत बिकट आहे. त्यामुळे त्याचा थेट फायदा भाजप विधानसभा निवडणुकीत उचलून उलट शिवसेनेवरच कुरघोडी करेल अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं