सीडीएस हे पद लष्कर, नौदल आणि हवाई दलप्रमुखांच्या वरचं असेल?

नवी दिल्ली: लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ असू शकतात. ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ नियुक्त करणार असल्याची घोषणा केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी एक उच्चस्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीडीएसच्या नियुक्तीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती नोव्हेंबरपर्यंत काम करेल. भारतीय हवाईदल प्रमुख बी.एस. धनोआ ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. बिपीन रावत यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. सीडीएस हे पद लष्कर, नौदल आणि हवाई दलप्रमुखांच्या वरचं असेल. भलेही ती व्यक्ती या तिन्ही दलप्रमुखांप्रमाणेच चार स्टार जनरल असेल. भविष्यात तिला ५ स्टार जनरलदेखील केलं जाऊ शकतं.
यापूर्वीच्या अनेक सरकारांनी राजकीय सहमतीअभावी सीडीएस पदासंबंधीचा निर्णय बासनात गुंडाळून ठेवला होता. त्यानंतर २०१२ मध्ये नरेश चंद्र टास्क फोर्सने चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव दिला. या समितीचा कार्यकाळ २ वर्षांचा असतो. या कमिटीत तिन्ही दलप्रमुख असतात. यातील सर्वात सिनिअर समितीचा अध्यक्ष असतो.
२३ डिसेंबर २०१६ ला आम्ही याबाबत अहवाल सादर केला होता. या अहवालाची दखल केंद्र सरकारने घेतल्याचे शेकटकर म्हणाले. या पदावरील अधिकारी तिन्ही सेनांचा प्रमुख असेल व तिन्ही सेनादलांच्या कामगिरीबाबत एकत्रीकरण करेल तसेच तिन्ही सेनादले व सरकारसोबत समन्वय साधेल. तिन्ही सेना दलांबाबतच्या सर्व बाबींचा मुख्य समन्वयक म्हणून हा अधिकारी काम करेल, असे ते म्हणाले. देशाला संरक्षणसज्ज करण्यासाठी व संभाव्य हल्ले रोखण्यासाठी विविध दूरगामी योजना आखण्यासाठी हा अधिकारी कार्यरत राहील, असे शेकटकर म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं