लोकं शांतच होती; पण काही दरबारी वृत्तवाहिन्या शांत राहिल्या हे देशाचं नशीब: सविस्तर

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. विशेष म्हणजे कालपासूनच सर्वच माध्यमातून शांततेचं आवाहन करण्यात येत होती. त्यात हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या अनेक समाजसेवी संस्थांनी देखील अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. लोकांना अफवांवर तसेच अफवा न पसरविण्याच आवाहन सर्वच स्थरातून करण्यात येत होती.
प्रसार माध्यमांनी म्हणजे विशेष करून टीव्ही वृत्त वाहिन्यांवरून शांततेचे आवाहन वारंवार करण्यात येत होती. मात्र मागील ५-६ वर्षातील देशातील सरकार दरबारी टीव्ही वृत्त वाहिन्यांचा विचार केल्यास ते नेमकी कोणती भूमिका घेणार यावर शांतता मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल असं अनेकांनी म्हटलं. विशेषकरून सामान्य लोकांना ज्यावेळी याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा अनेकांनी, ‘काय तो निकाल लागू दे एकदाचा’ अशा प्रतिक्रिया दिल्या, तर अनेकांना दैनंदिन व्याप एवढे आहेत की त्यांना अशा विषयांवर वेळच नाही. जी बोंबाबोंब टीव्ही वृत्तवाहिन्यांवर रंगवली जाते, त्याचा आणि जमिनीवरील वास्तवाचा काहीच संबंध नसल्याचं अनेकवेळा पाहायला मिळालं आहे. मागील काही काळापासून स्टुडियो रिपोर्टींगच्या माध्यमातून धार्मिक भावना भडकविण्याचा विडाच काही दरबारी टीव्ही वृत्त वाहिन्यांनी उचलला होता आणि ते सहज अनेक वृत्त वाहिन्यांवरील चर्चांमधून नजरेस पडायचं. त्यामुळे आजच्या निकालावेळी लोकं शांतच राहतील असंच चित्र होतं, मात्र आज दरबारी टीव्ही वृत्त वाहिन्या नेमकी कोणती भूमिका घेणार यावर देशात शांतता राहणार की परिस्थिती चिघळणार हे निश्चित होणार होतं. मात्र झालं असं, आज याच काही वृत्त वाहिन्यांनी त्यांच्या ‘दरबारी’ वृत्तांकनावर नियंत्रण मिळवलं आणि आज लोकं शांत होती, ती शांतच राहिली आणि देशाचा जीव भांड्यात पडला असं म्हणावं लागेल.
अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामजन्मभूमी न्यासाकडे द्यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. दरम्यान मुस्लिम याचिकाकर्ते `इकबाल अन्सारी यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्याणाचं स्वागत करत, हिंदू-मुस्लिम समाजाला जातीय सलोखा राखण्याचं आवाहन केलं आहे.
दुसरीकडे, हे प्रकरण अनेक दशकांपासून चालू होते आणि ते योग्य निष्कर्षावर पोहोचले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत आहे. जय-पराभवाच्या दृष्टीकोनातून या निकालाकडे पाहू नये, भूतकाळात जे घडलं ते विसरुया आणि पुन्हा एकत्र येऊ, समाजात शांतता अन् सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करुयात असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
दरम्यान, अयोध्या प्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने समाजाच्या सर्व वर्गांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने विचार केला ही खूपच चांगली गोष्ट असल्याचे पवार म्हणाले. अयोध्या प्रकरणी हा ऐतिहासिक निर्णय आला असून या निर्णयाचा सर्व वर्गातील लोकांनी सन्मान करायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी लोकांना केले. सु्प्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर लगेचच लोक वादग्रस्त जागी जाऊन पूजा करू लागले आहेत, या वर प्रतिक्रिया विचारली असता पवार म्हणाले की, कुणाला मंदिरात जायचे असेल त्यांनी जावे, कुणाला मशिदीत जायचे असेल त्यांनी जावे, तो त्यांचा अधिकार आहे. देशात शांततेसाठी समाजात बंधुभाव वाढण्यास मदत केली पाहिजे. असे पवार म्हणाले. हा विषय राजकारणापलिकडचा असल्याचेही ते म्हणाले.
तसेच आजच्या निकालावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राम मंदिर उभं राहावं तसं रामराज्य यावं अशीही अपेक्षा आहे. सुप्रीम कोर्टाला धन्यवाद द्यावे तितके कमी आहे. लवकरात लवकर राम मंदिर उभं राहावं हीच इच्छा आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अतिशय आनंद झाला. जे कारसेवकांनी बलिदान दिलं त्यांना न्याय मिळणार का? हा इतकी वर्ष प्रश्न होता तो आज निकाली लागला, पण आज बाळासाहेब हवे होते असं त्यांनी आजच्या निकालावर मत व्यक्त केलं.
अयोध्याबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला आहे. आम्ही देखील राम मंदिर निर्माणाच्या बाजूने आहोत. या निकालाने मंदिर बनविण्याचं दार उघडलं गेलं मात्र या मुद्द्याचं राजकारण करणाऱ्यांचे दार बंद झालं अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.
वादग्रस्त जागेत १८५६-५७ पर्यंत याठिकाणी नमाज पढण्यात आला नव्हता. त्यापूर्वी याठिकाणी हिंदूकडून पूजा केली जात होती. या जागेवर दावा सांगणारा कोणताही पुरावा सुन्नी वक्फ बोर्डाला सादर करता आला नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादाचा निकाल येण्यास सुरूवात झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. उद्या (१० नोव्हेंबर) सकाळी ११ वाजेपर्यंत लागू असणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं