इस्रोच्या या मोहीमेला हादरा, 'जीसॅट- ६ ए' उपग्रहाचा संपर्क तुटला

नवी दिल्ली : इस्रोच्या महत्त्वाकांक्षी मोहीमेला रविवारी हादरा बसला आहे. ‘जीसॅट- ६ ए’ उपग्रहाच प्रक्षेपण केल्यानंतर ४८ तासांनंतर संपर्क तुटला आहे. तशी माहिती इस्त्रोनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.
इस्रोचा ‘जीसॅट- ६ ए’ या उपग्रहाच प्रक्षेपण केल्यानंतर ४८ तासांनंतर संपर्क तुटला आहे. या महत्वाकांक्षी उपग्रहाच्या बांधणीसाठी २७० कोटी रुपये खर्च झाले होते. हा उपग्रह १० वर्षांपर्यंत सेवा देईल, असे इस्रोने स्पष्ट केले होते. या महत्वाकांक्षी उपग्रहामुळे सॅटेलाइट आधारित मोबाइल कॉलिंग आणि कम्यूनिकेशन सेवा अधिक प्रभावी होणार होती.
या उपग्रहामुळे भारतीय लष्कराच्या अतिशय दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांमध्ये समन्वय आणि संवाद अधिक सुलभ होणार होते. या उपग्रहावर सर्वात मोठा अॅँटेना बसविण्यात आला होता आणि त्याची निर्मिती इस्त्रोनेच निर्मिती केली होती. हा उपग्रह भारतीय लष्करासाठी खूप महत्वाचा होता. परंतु केवळ ४८ तासातच इस्रोचा संपर्क तुटल्याने या महत्वाकांक्षी मोहिमेला रविवारी मोठा हादरा बसला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं