जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांकडून तरुणांना दगडफेकीची नोकरी

मुंबई : उत्तर प्रदेशातील दोन तरुणांना नोकरीचे अमिश दाखवून अतिरेक्यांकडून जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांकडून दगडफेकीचं काम दिल्याचा खुलासा या तरुणांनी केला आहे. त्यावरून जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणारे युवक हे भाड्याने आणलेली माणसं असल्याचं समोर आलं आहे.
हे दोन्ही तरुण उत्तर प्रदेशातील सहारनपूर व बागपत या भागातील रहिवासी असल्याचे समजते. तुम्हाला काश्मीरच्या पुलवामामध्ये टेलरची नोकरी आणि प्रति महिना २० हजार रुपये देतो असं अमिश त्यांना देण्यात आलं होत. परंतु नोकरीच्या ठिकाणी पोहोचताच त्यांना दगडफेक करण्याचं ट्रेनिंग देऊन जम्मू-काश्मीरमधील लष्करावर आणि सुरक्षा दलावर दगडफेक करण्याचे आदेश देण्यात आले अशी धक्कादायक कबुली या दोन तरुणांनी दिली आहे.
या असल्या नोकरीमुळे आम्ही रोजच चिंताग्रस्त असायचो त्यामुळे पुन्हा गावाकडे जाण्यासाठी परवानगी मागताच आम्हाला चोरीच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देण्यात यायची असा खुलासा या तरुणांनी एका खासगी टिलिव्हिजन वृत्तवाहिनीकडे केला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं