JNU: माजी लष्करप्रमुख रावत राजकीय भाष्य करत; पण लष्करप्रमुख नरवणे यांनी ते टाळलं

नवी दिल्ली: माजी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी जेएनयू’वर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. यावर पत्रकारपरिषदेमध्ये नरवणे यांना प्रश्न विचारण्यात आला. जेएनयूच्या नावावर राष्ट्रीय सुरक्षा अकादमी एनडीएची पदवी दिली जाते. त्याच विद्यापीठामध्ये वादंग सुरू आहेत. तेथील विद्यार्थ्यांवर मास्कधारी हल्लेखोरांनी मारहाण केली होती. याविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. एवढे सगळे घडत असताना तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने विचारला.
यावर नरवणे यांनी सांगितले की, एनडीए देशाची सर्वोत्तम संस्था आहे. मी देखील त्याच एनडीएमधून आलोय ज्या एनडीएमध्ये सध्याचे हवाईदल प्रमुख आणि नौसेना प्रमुख आले आहेत. एनडीच्या कार्यप्रणालीची अनेक उदाहरणे दिली जातात. मात्र नरवणे यांनी जेएनयू हल्ला आणि वादावर बोलणे टाळले. रावत यांनी वाद ओढवून घेतला होता. त्यांना सैन्यदलातूनही विरोध झाला होता. एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याने असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते.
तसेच त्यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठे विधान केले. संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा संसदीय संकल्प आपण केलेला आहे. पीओके भारतात आला पाहिजे अशी जर संसदेची इच्छा असेल तर त्याबाबत आम्हाला योग्य आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू, असे सूचक विधान लष्कप्रमुख मुकुंद नरवणे यांनी केले आहे.
पाकिस्तान आणि चीनच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार असल्याचं नरवणे म्हणाले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हालचालींवर करडी नजर ठेवून योग्य ती कारवाई करत पाकचे मनसुबे उधळून लावण्यात भारताला यश येत असल्याचं नरवणे यांनी यावेळी सांगितलं.
जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये दोन निशस्त्र नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आल्याने त्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. याबद्दल बोलताना लष्करप्रमुख नरवणे यांनी म्हटले की, आम्ही अशाप्रकारे अमानुष कारवाईचा आधार घेत नाही, सैन्य रुपाने आम्ही अशा घटनांना योग्यप्रकारे हाताळू. सियाचीन बद्दल बोलताना त्यांना सांगितले की, सियाचीन आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे, ज्या ठिकाणी एक फॉर्मेशन पश्चिमी आणि उत्तरी मोर्चा सांभाळून आहे. हे धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचे आहे, या ठिकाणाहूनच काही होऊ शकते, असे देखील नरवणे यांनी यावेळी सांगितले.
Web Title: JNU attack what do you think about attack JNU answer given by Army Chief Manoj Naravane.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं