ब्रेकिंग न्यूज: मागणी असेल तरच लोया प्रकरणाची चौकशी करावी: शरद पवार

नवी दिल्ली: सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे 10 वर्षापर्यंत सुरक्षित ठेवण्यात यावी या विनंतीसह दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली. अॅड. सतीश उके यांनी ही याचिका दाखल केली होती. आता, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी जस्टील लोया प्रकरणाच्या चौकशींसदर्भात विधान केलं आहे. जर, मागणी असेल आणि गरज असेल तरच लोया प्रकरणाची चौकशी करावी, असे पवार यांनी म्हटलंय.
संपूर्ण देशात देशात बहुचर्चित ठरलेलं प्रकरण म्हणजे न्यायमूर्ती लोया प्रकरण म्हणता येईल, ज्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघालं होतं. तत्पूर्वी देशाचे लक्ष लागून राहिलेल्या न्यायमूर्ती बी.एच.लोयांच्या मृत्यूप्रकरणाच्या खटल्यावर सर्वोच न्यायालयाने निकाल देत न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार नाही, असा स्पष्टं निर्णय दिला होता.
न्यायमूर्ती बी.एच.लोयांच्या मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एक याचिका सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आली होती. त्या याचिकेवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता आणि न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार नाही असं स्पष्ट केलं होतं.
१ डिसेंबर २०१४ रोजी न्यायमूर्ती बी.एच.लोयां आपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला गेले होते तेंव्हा तिथं त्यांचा मृत्यू झाला. परंतु कॅराव्हान मॅगेझिननं काही महिन्यांपूर्वी न्यायमूर्ती बी.एच.लोयां मृत्यू संशयास्पद असल्याची बातमी दिली होती आणि देशभर खळबळ उडाली होती. त्यामुळे न्यायमूर्ती बी.एच.लोयांच्या मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एक याचिका सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यावर अंतिम निर्णय देताना सर्वोच न्यायालयाने अंतिम निकाल देत न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार नाही असा स्पष्टं निर्णय दिला. विशेष सीबीआय न्यायाधीश बी.एच.लोयां हे सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटरच्या खटल्याची सुनावणी करत होते त्यामुळे हा विषय देशभरात चर्चेला आला होता.
देशात आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्याने निष्पक्ष चौकशी होतं नसल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. मात्र ज्या महाराष्ट्रात सदर घटना घडली होती तिथे आता भाजप सत्तेतून पायउतार झाली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैत्रुत्वात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याने सदर प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी केली जाण्याची मागणी डोकं वर काढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येते आहे. त्यात पवारांनी असं विधान करून सूचक इशारा दिल्याचं म्हटलं जातं आहे.
जस्टीस लोया प्रकरणाबाबत मला जास्त माहिती नाही, मी केवळ वर्तमानपत्रात काही लेख वाचले आहेत. हे लेख वाचल्यानंतर, या प्रकरणाची मूळापर्यंत जाऊन चौकशी केली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रात अनेक लोकांची आहे. माझ्याजवळ यासंदर्भात डिटेल्स माहिती नाही. पण, मागणी होत असेल तर सरकारने याबाबत विचार केला पाहिजे. या चौकशीची मागणी करणारे कुठल्या आधारे मागणी करत आहेत. यामध्ये काय तथ्य आहे, याची चौकशी केली पाहिजे. जर काही आढळलं तर रिइन्व्हेस्टीगेशन करायला पाहिजे. मात्र, काहीच नसेल तर एखाद्याविरुद्ध आरोप लावण्यासाठी असं करणंही चुकीचं आहे, असं मत पवार यांनी जस्टीस लोया प्रकरणावर दिलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं