मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत शेतकरी आंदोलक घरी परतले

नवी दिल्ली : भारतीय किसान युनिअनची हरिद्वारहून निघालेली ‘किसान क्रांती पदयात्रा’ नवी दिल्लीतील किसान घाट येथे समाप्त करण्यात आली. काल रात्री उशिरा पोलिसांनी शेतकऱ्यांना किसान घाटावर जाण्याची अधिकृत अनुमती दिली. मात्र, केंद्र सरकार शेतकरीविरोधी असून मागण्या पूर्ण झालेल्या नसल्याचा आरोप करत शेतकरी निराश होऊन परतण्यास सुरुवात झाली आहे. आपण हे आंदोलन आता मागे घेत आहोत आणि त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी पुन्हा आपापल्या घरी परतावे, असे आवाहन शेतकरी नेते टिकैत यांनी केले.
या किसान क्रांती यात्रेला दिल्ली-युपीच्या सीमेवर हिंसक वळण लागले. त्यात आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी युपी आणि दिल्लीच्या पोलिसांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. शेवटी मंगळवारी रात्री उशिरा सुमारे १२.३० वाजता पोलिसांनी बॅरिकेड्स बाजूला केले आणि आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यास परवानगी दिली गेली.
किसान क्रांती यात्रेचे प्रतिनिधी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यादरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा सुद्धा झाली. त्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बीकेयू प्रमुख नरेश टिकैट यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यानंतर अखेर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा जाहीर केली. दरम्यान किसान घाट येथे फुले वाहून आम्ही आमचे आंदोलन मागे घेतले आहे आणि हे सरकार शेतकरीविरोधी आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत, असा आरोप मोदी सरकारवर केला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं