अमित शहा उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर उद्धव ठाकरे यांची विशेष उपस्थिती

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा लोकसभा निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुजरातला जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याचं वृत्त आहे. त्यासाठी शहांनी उद्धव ठाकरेंना थेट गुजरातला येण्याचं आमंत्रण दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील ते आमंत्रण स्वीकारलं आहे.
सध्या राज्यसभेचे खासदार असलेले अमित शहा यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. ते उद्या गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल करतील. मात्र त्याआधी भव्यदिव्य रोड शो केला जाईल. त्यासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यात आलं आहे. ठाकरे यांनी हे आमंत्रण स्वीकारलं आहे. शिवसेना आणि भाजपामधील संबंध मागील ५ वर्षांमध्ये अतिशय विकोपाला गेले होते. परंतु, फेब्रुवारीत दोन्ही पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता दोन्ही पक्षांकडून एकी दाखवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शिवसेनेनं सतत त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. परंतु, तरीही शिवसेना केंद्र आणि राज्यातील सरकारमध्ये कायम होती. या काळात अनेकदा शिवसेनेकडून खिशात घालण्याचे इशारे देण्यात आले. अमित शहांनीही पटक देगें म्हणत शिवसेनेवर शरसंधान साधलं होतं. तर उद्धव यांनी भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्र्यांचा उल्लेख अफजलखानाच्या फौजा म्हणून केला होता. मात्र फेब्रुवारीत दोन्ही पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील २५ जागा भाजपा, तर २३ जागा शिवसेना लढवेल. तर विधानसभेला निम्म्या म्हणजेच प्रत्येकी १४४ जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं