५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी होणार? न्यायालयात लवकरच सुनावणी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान २१ विरोधी पक्षांनी ईव्हीएमसंदर्भात केलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. ५० टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी या याचिकाद्वारे केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असताना विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिन्सबद्दल शंका उपस्थित केली. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी थेट मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जाहीर पत्रकार परिषद घेतली होती.
या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांनी अतिशय गंभीर आरोप केले. ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं किंवा त्यात तांत्रिक छेडछाड करता येते, असा या पक्षांचा दावा आहे. एवढंच नाही तर ईव्हीएम रशियातून नियंत्रित केलं जातं असा आरोप सुद्धा चंद्रबाबू नायडू यांनी केला आहे. तर फक्त पराभवाच्या भीतीनेच विरोधक हे आरोप करत असल्याचा पलटवार भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अतुल शहा यांनी केला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं