लोकसभा २०२४ मध्ये प्रशांत किशोर मोठा राजकीय भूकंप करणार? | मोदींच्या सर्व व्युहरचनांचा त्यांना अनुभव.. आता थेट

नवी दिल्ली, ०४ ऑगस्ट | प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा खरी ठरणार असल्याची वृत्त आहे.
आगामी ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीसह काँग्रेस २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली असून, पक्षाने आता नवीन व्यूहरचनेकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. यातच आता प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याबद्दल काँग्रेस सकारात्मक असून, याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान हवं आहे. त्यासंदर्भात त्यांनी काही पर्याय काँग्रेसला सूचवले असून, आगामी काळात प्रशांत किशोर सोनिया गांधी यांचे सल्लागारपदीही दिसू शकतात.
विशेष म्हणजे गुजरातमध्ये मोदींसाठी काम केल्यापासून ते २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत देशात मोदी सरकार आणण्यापर्यंत प्रशांत किशोर हे थेट मोदींच्या अत्यंत जवळचे आणि त्यांच्या निवडणूक नीतीची खडानखडा माहिती असणारे व्यक्ती आहेत. परिणामी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँगेसने देखील थोडं नमतं घेत आणि प्रशांत किशोर यांना थेट सोनिया गांधीचे सल्लागार म्हणून नियुक्त करून मोदी सरकारला पायउतार करण्याची योजना आखल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काँग्रेस देखील जोरदारपणे कामाला लागण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
अनेक राज्यांच्या विधानसभेत मोदी-शहांना शह:
प्रशांत किशोर यांनी अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोदी शहांना धूळ चारली आहे. मोदी-शहांनी मोठ्या प्रमाणावर अर्थकारण, मीडिया मॅनेजमेंट आणि संबंधित राज्यातील निवडणुकीत मोठी निवडणूक पूर्व योजना आखूनही ते प्रशांत किशोर यांच्या प्रत्यक्ष जमिनीवरील रणनीतीमुळे पराभूत झाले होते. अगदी नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये त्याचे परिमाण समोर आहेत. तत्पूर्वी, पंजाब, दिल्ली आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये देखील तेच पाहायला मिळालं होतं. अगदी मोदी ब्रँड देशभरात मोठं करण्यातही त्यांची स्वतःची मोठी भूमिका आहे. त्यामुळे २०२४ मध्ये देखील ते मोठा राजकीय भूकंप करतील जर काँग्रेसने त्यांना थेट सोनिया गांधींचे सल्लागार नेमल्यास असं म्हटलं जातंय.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Loksabha Election 2024 Prashant Kishor may appoint as a advisor to Sonia Gandhi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं