ठरवून ? मोदींना लंडन मुलाखतीत प्रश्न विचारणारे भाजपावालेच : सविस्तर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लंडन दौरा आणि मोदींची वेस्टमिंस्टर हॉल मधील मुलाखत सर्वत्र लाईव्ह वर दाखविण्यात आली होती. मोदींच्या त्याच मुलाखती दरम्यान एका युवकाने मोदींना प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावर मोदींनी दिलेल्या उत्तराने सर्वच वर्तमान पात्रांचे मथळे भरून गेले होते. जणूकाही एका सामान्य लंडन स्थित युवकाने पंतप्रधांना प्रश्न विचारला आणि त्यावर पंतप्रधानांनी अप्रतिम मार्मिक उत्तर दिल असा गवगवा करण्यात आला.
परंतु आता त्या प्रश्ना मागचं सत्य बाहेर आलं आहे. तरणप्रीत सिंह नामक युवकाने नरेंद्र मोदींना एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता की, मोदीजी तुम्ही २०-२० तास काम करून सुद्धा थकत नाही! तुम्हांला ही ऊर्जा मिळते कुठून ? आम्हाला तुमच्या त्या फिटनेसच रहस्य सांगावं म्हणजे आम्ही सुद्धा आपल्या देशासाठी असं काम करू शकतो ? त्यावर मोदींनी एक उत्तर दिलं जे सर्वत्र बातम्यांमध्ये ठळक पणे दाखविण्यात आलं.
नरेंद्र मोदींनी त्या तरणप्रीत सिंह नामक युवकाच्या प्रश्नाला उत्तर दिल की, ‘मी जवळजवळ २० वर्षापासून रोज जवळजवळ दोन किलो शिव्या खात असतो’. मोदींनी दिलेलं हेच उत्तर सर्वच वर्तमान पत्रात हेडिंगला छापण्यात आला. इतकंच नाही तर मोदींच्या चाहत्यांनी हेच उत्तर समाज माध्यमांवर उदो-उदो जाण्यासाठी पुरेपूर वापरलं आणि व्हायरल सुद्धा केलं. वर्तमान पात्रात मथळे छापून आले की. एका सामान्य युवकाच्या प्रश्नाला नरेंद्र मोदी यांनी एका नव्या अंदाजात उत्तर दिलं. परंतु त्यातील वस्तुस्थिती समोर आली आहे. तरणप्रीत सिंह नामक युवक कोणी सामान्य युवक नव्हता.
मोदींना प्रश्न विचारणारा हा तरणप्रीत सिंह नामक युवक दुसरा तिसरा कोणी नसून भाजपचे झारखंडचे प्रवक्ते अमरप्रीत सिंह काले यांचा मुलगा असून तो लंडन स्थित ‘University of Warwick’ येथे शिक्षण घेत आहे. अमरप्रीत सिंह काले यांचे नरेंद्र मोदी यांच्या बरोबरचे फोटोसुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. आम आदमीच्या नेत्या अलका लांबा यांनी हे सर्व पुराव्यानिशी उघड करून हे सर्व ठरवून करण्यात आलं असा आरोप केला आहे. त्या पोस्ट मध्ये अमरप्रीत सिंह काले हे पोस्टमध्ये स्वतःच्या मुलाची ओळख करून द्यायला गेले आणि स्वतःच त्यात अडकले आणि पक्षाला सुद्धा उघडं पाडल अशी सर्वत्र चर्चा आहे.
भाजप या खुलाशाने चांगलीच तोंडघशी पडली आहे असं एकूण चित्र आहे. देशाबाहेर घडणाऱ्या या गोष्टी म्हणजे ठरवून केलेलं ‘इव्हेंट’ आहेत की काय असच सामान्य भारतीयांना वाटू लागलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं