हार्दिक पटेलवर शाईफेक, उज्जैनमधील घटना

भोपाळ : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. सदर घटना मध्य प्रदेशातील उज्जैन येथे घडली आहे.
शाईफेक करणाऱ्या युवकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे नाव मिलिंद गुर्जर असल्याचे समजते. संबंधित ठिकाणी हार्दिक पटेल पत्रकार परिषद घेण्यासाठी आला होता त्यावेळी गर्दीत हा प्रकार घडला असून त्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे.
हार्दिक पटेल याने केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी गुर्जर आणि पटेल समाजाची फसवणूक केल्याचा आरोप संबंधित युवकाने केला आहे. विशेष म्हणजे हार्दिक पटेल याने पत्रकार परिषद घेऊन मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यापमं घोटाळ्यावरून शिवराजसिंग चौहान याच्या सरकारवर तोफ डागली होती आणि त्यानंतर ही घटना घडल्याने वेगळाच संशय घेतला जात आहे.
#WATCH: Man threw ink on Hardik Patel during an event in Ujjain, later apprehended by police. #MadhyaPradesh (07.04.18) pic.twitter.com/ccb1oS69sL
— ANI (@ANI) 7 April 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं