पुलगाव: शस्त्र भांडाराजवळ स्फोट; ६ ठार

वर्धा : येथील पुलगावमध्ये असणाऱ्या भारतीय लष्कराच्या शस्त्र भांडाराजवळ जुनी स्फोटकं निकामी करत असताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात तब्बल ६ जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या भीषण स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये काही स्थानिक नागरिकांचा सुद्धा समावेश असल्याचे वृत्त आहे. तसेच जखमींचा आकडा अजून वाढण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण स्फोटामुळे आसपासच्या परिसरात जोरदार हादरे बसल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
इंडियन आर्मीसाठी पुरवठा होणाऱ्या दारुगोळ्याचे भांडार पुलगावमध्ये आहे. या शस्त्र भांडाराजवळ ऑर्डिन्स फॅक्टरीची रेंज आहे. दरम्यान, या ठिकाणी जुने झालेले बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरु होते. जबलपूर ऑर्डिन्स फॅक्टरीतून लष्कराचे काही कर्मचारी जुनी स्फोटकं निकामी करण्यासाठी पूलगावमध्ये दाखल झाले होते. त्यादरम्यान एक बॉम्ब निकामी करताना भीषण स्फोट झाला असं वृत्त आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा जून २०१६ मध्ये पुलगावच्या शस्त्र भांडाराला मोठी आग लागली होती. त्यानंतर संपूर्ण परिसर मोठं मोठ्या स्फोटांनी हादरून गेला होता. त्यावेळी स्फोटाचे हादरे जवळपास १५ कि.मी पर्यंत जाणवले होते.
स्फोटातील जखमींची नावे:
विकास बेलसरे, संदीप पचारे, अमित भोवते, रूपराव नेताम, दिलीप निमगडे, मनोज मोरे
तर मृतांची नावे:
प्रभाकर वानखेडे , राजकुमार भोवते, विलास पधारे, नारायन पचारे, प्रवीण मुंजेवार
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं